Defamation notice from Governor : मोठी बातमी! देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्यपालांनी मुख्यमंत्री अन् आमदारांना पाठवली मानहानीची नोटीस!

Defamation notice from Governor to CM Mamta Banerjee and MLA's : जाणून घ्या, नेमकं कोणत्या राज्यामधील आणि काय सगळं आहे प्रकरण? ; सध्या या मानहानीच्या नोटीसची जबरदस्त चर्चा सुरू आहे.
Defamation notice
Defamation noticesarkarnama
Published on
Updated on

West Bengal Governor Send Defamation notice to CM Mamta Banerjee : पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि राज्यपाल यांच्यात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कुणाल घोष यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या दोन आमदारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. राज्यापल बोस यांच्यावतीने पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये सर्व नेत्यांना म्हटले गेले आहे की, तुम्ही राज्यपालांची बदनामी केली आहे. यासंबंधी तत्काळ माफी मागावी, अन्यथा 11-11 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला जाईल.

ही नोटीस तृणमूल काँग्रेसच्या(TMC) नवनिर्वाचित आमदार सयंतिका बॅनर्जी आणि रैयत हुसैन सरकार यांना पाठवली गेली आहे. पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात एखाद्या राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि आमदारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे.

Defamation notice
Former Congress MP Sajjan Kumar : शीखविरोधी दंगली प्रकरणात कांग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; तब्बल 41 वर्षांनी निकाल

नोटीसचे संपूर्ण प्रकरण काय? -

मे 2024 मध्ये पश्चिम बंगालमध्ये 2 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली, ज्यामध्ये बारानगर मतदारसंघातून सयंतिका बॅनर्जी आणि भगवान गोला मतदारसंघातून रैयत सरकारने विजय मिळवला. दोन्ही आमदरांच्या शपथविधीबाबत समस्या होती. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांना शपथ देण्याचा अधिकार दिला नाही. राज्यपालांचे म्हणणे होते की उपसाभती दोघांना शपथ देतील.

याचबरोबर दोन्ही आमदारांनी राजभवनात जाऊनही शपथ घेण्यास नकार दिला. या आमदारांचे म्हणणे होते की, राजभवन सुरक्षित नाही. जेव्हा संपूर्ण घटनाक्रम सुरू होता, तेव्हा बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजभवानाबाबत गंभीर टिप्पणी केली होती. ममता बॅनर्जींचे म्हणणे होते की, राजभवन महिलांसाठी सुरक्षित नाही.

Defamation notice
Jitendra Tyagi : मुस्लिमांनो सनातन धर्मात या! शिया वक्फ बोर्डाचा माजी अध्यक्ष म्हणतो, 'दरमहा तीन हजार देतो'

यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जींना(Mamta Banerjee) राजभवानाबाबत अशाप्रकारे टिप्पणी न करण्यास सांगितले होते. म्हटले जात होते की, या घटनेदरम्यान दोन्ही आमदारांनी राज्यपालांबाबत गंभीर आरोप केले, ज्याची कायदेशीर नोटीस आता पाठवली गेली.

राज्यपाल सीव्ही बोस(CV Bose) यांनी जी मानहानीची नोटीस पाठवली आहे, त्यामध्ये 11-11 कोटींचा उल्लेख आहे. विशेष बाब म्हणजे सयंतिका बॅनर्जी यांची एकूण संपत्ती 45 लाख आणि रैयत हुसैन सरकार यांची एकूण संपत्ती तीन कोटी आहे. सयंतिका या बंगाली चित्रपटांमधील अभिनेत्री आहेत, तर सरकार यांनी तृणमूल काँग्रेसमधून राजकीय करियरची सुरुवात केली होती. याशिवाय ममता बॅनर्जींची एकूण संपत्ती 16 लाख रुपये आहे, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी अशाताच याबाबत खुलासा केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com