Kakoli Ghosh letter : पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यापासून तृणमूल काँग्रेसच्या अडचणींमध्ये मोठी होताना दिसत आहेत. कारण माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कधीकाळी अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू मानल्या जाणाऱ्या टीएमसी खासदार काकोली घोष यांनी बंडखोर भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
नुकतंच त्यांनी बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या बैठकीला उपस्थिती लावल्याने विविध चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आता त्यांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहित पक्षाचे मुख्य प्रतोद कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची परवानगी मागितली आहे.
त्यांच्या या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. काकोली घोष यांनी पत्राद्वारे बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभेच्या सभागृहात आपल्याशी गैरवर्तन केले आहे. तसेच अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी आपल्या पत्रात कल्याण बॅनर्जी यांनी केवळ आपल्यासोबतच नव्हे तर इतर अनेक महिला खासदारांसोबतही त्यांचं वागणं आक्षेपार्ह आणि अपमानजनक असल्याचं म्हटलं आहे.
तर या प्रकरणात हस्तक्षेप करून औपचारिक तक्रार दाखल करण्यास परवानगी द्यावी तसेच संबंधितांवर योग्य कारवाई करून शिक्षा देण्याची मागणी त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. त्यांच्या या पत्रामुळे आता टीएमसीमधील नेत्यांचे मतभेद उघड झाले आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी काकोली घोष यांना लोकसभेतील मुख्य प्रतोद पदावरून हटवून त्यांच्या जागी कल्याण बॅनर्जी यांची नियुक्ती केली होती. तेव्हापासून घोष या नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशातच आता त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे कल्याण बॅनर्जी यांची तक्रार केल्यामुळे टीएमसीतील अंतर्गत वाद उफाळून आल्याचं दिसत आहे.
एकीकडे घोष यांना टीएमसीच्या मुख्य प्रतोद पदावरून हटवलं तर दुसरीकडे या निर्णयानंतर अवघ्या काही तासांतच केंद्र सरकारने काकोली घोष यांना Y श्रेणीची सुरक्षा प्रदान केली होती. त्यामुळे आता घोष या टीएमसीऐवजी भाजपला पुरक निर्णय आणि भूमिका घेणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय त्यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींच्या बैठकीला हजेरी लावल्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.