Mahua Moitra  Sarkarnama
देश

Mahua Moitra : एक कुत्रा ठरला महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेतून हकालपट्टीचे कारण; नेमकं काय आहे प्रकरण...

Jay Anant Dehadrai : एक्स बॉयफ्रेंडने केली होती सीबीआयकडे तक्रार...

Rajanand More

Cash For Query Case : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांची शुक्रवारी ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणामुळे लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. मोईत्रा यांनी भाजपवर जोरदार शरसंधान साधले. पण ‘कॅश फॉर क्वेरी’ या प्रकरणाची सुरूवात कशी झाली माहिती आहे का? एक पाळीव कुत्रा त्यासाठी कारणीभूत ठरला आहे. होय, हे खरे आहे. मोईत्रा यांच्या एक्स बॉयफ्रेंडनेच याचा भांडाफोड केला होता, तोही कुत्र्याचा ताबा मिळावा यासाठी. हे दावा खुद्द मोईत्रा यांचाच आहे.

भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांनी कॅश फॉर क्वेरी हे प्रकरण संसदेत उपस्थित करून त्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिस्तपालन समितीने याची चौकशी करून शुक्रवारी लोकसभेत अहवाल सादर केला. हे प्रकरण खूप गंभीर असल्याचे सांगत केंद्र सरकारने मोईत्रा यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव मांडला. आवाजी मतदानाने या ठरावावर शिक्कामोर्तब झाले आणि मोईत्रा यांना खासदारकी गमवावी लागली.

अशी झाली या प्रकरणाची सुरूवात

सर्वोच्च न्यायालयातील वकील जय अनंत देहाद्राई हे मोईत्रा यांचे एक्स बॉयफ्रेंड. हे दोघे जवळपास तीन वर्ष एकत्र राहत होते. आता मोईत्रा या दिल्लीत एकट्याच राहतात. देहाद्राई यांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मोईत्रा यांच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार केली. संसदेत अदानी समूहाला लक्ष्य करणारे प्रश्न उपस्थित करण्यासाठी मोईत्रा यांनी लाच म्हणून रोख रक्कम व गिफ्ट घेतल्याचा दावा देहाद्राई यांनी या तक्रारीत केला होता. त्यांनी खासदार दुबे यांना पत्राद्वारे याबाबत माहिती दिली. त्यानंतर दुबे यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला. विशेष म्हणजे, मोईत्रा या दुबे यांना त्याच्या पदवीरून सातत्याने लक्ष्य करत असतात. त्यांनाच देहाद्राई यांनी पत्र लिहिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोईत्रा यांनी १७ ऑक्टोबर ररोजी देहाद्राई यांना मानहानीची कादेशीर नोटीस पाठवली. त्यामध्ये त्यांनी आपला हेन्री नावाचा पाळीव कुत्रा देहाद्राई यांनी चोरला होता. पण नंतर तो परत केला. या कुत्र्याचा ताबा कुणाकडे असावा, यावरून सुरू असलेल्या वादाच्या रागातूनच त्यांनी ही तक्रार केल्याचा आरोप मोईत्रा यांनी केला होता. त्यावर देहाद्राई यांनीही पलटवार केला. सीबीआयकडे तक्रार केल्याने आपल्या कुत्र्याचे मोईत्रा यांनी अपहरण केल्याची तक्रार देहाद्राई यांनी १९ ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांकडे केली.

सीबीआकडे केलेली तक्रार मागे घेतल्यास हेन्सीला परत करण्याची ऑफरही मोईत्रा यांनी दिल्याचा दावा देहाद्राई यांनी एक्सवर केला होता. पण ही ऑफर फेटाळल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. हेन्री घरात कोंडून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला होता. ते सातत्याने हेन्रीविषयी एक्सवर पोस्ट करत असतात. अजूनही हेन्रीच्या ताब्यावरून वाद सुरू असला तरी महुआ मोईत्रा यांना मात्र खासदारकीवर पाणी सोडावे लागले आहे.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT