Mukul Roy and Mamata Banerjee

 

Sarkarnama

देश

मुकुल रॉय यांचं मानसिक संतुलन बिघडलं! पक्षानेच केला खुलासा

तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय (Mukul Roy) यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची माहिती समोर येऊ लागली आहे.

सरकारनामा ब्युरो

कोलकता : तृणमूल काँग्रेसचे (TMC) ज्येष्ठ नेते मुकुल रॉय (Mukul Roy) यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनीच केला आहे. तृणमूलचे सरचिटणीस पार्थ चटर्जी यांनी याला दुजोरा दिला आहे. रॉय हे पक्षाचे पदाधिकारीही नसल्याचे चटर्जी यांनी स्पष्ट केले आहे. रॉय यांचे मानसिक संतुलन बिघडल्याच्या चर्चेने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

राज्यात आगामी 111 महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. यातच मुकुल रॉय यांनी केलेल्या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आगामी महापालिका निवडणुकांत भाजप मोठ्या मताधिक्याने विजयी होईल, असे त्यांनी म्हटले होते. याबाबत नंतर विचारणा केली असता त्यांनी तृणमूल आणि भाजप हे दोन्ही सारखेच पक्ष असल्याचे म्हटले होते. त्यावेळी पक्षाचे बीरभूम जिल्हाध्यक्ष अनुव्रत मंडल यांनी रॉय यांना माध्यमांपासून दूर नेले.

नंतर काही वेळातच मंडल यांनी माध्यमांसमोर रॉय यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा खुलासा केला. याला पक्षाचे सरचिटणीस पार्थ चटर्जी यांनीही दुजोरा दिला. रॉय हे पक्षाचे पदाधिकारी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काहीही असले तरी रॉय त्यांच्या या विधानावरुन राजकीय धुरळा उडू लागला आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले रॉय यांनी काही महिन्यांपूर्वीच तृणमूलमध्ये घरवापसी केली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवली. या निवडणुकीत भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली होती. ममतांनी विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळत विरोधकांना धूळ चारली होती. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसने बाजी मारत कोलकता महापालिकेत मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे आता आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांकडे लक्ष लागले आहे.

नुकत्याच झालेल्या कोलकता महापालिकेच्या निवडणुकीत 144 जागांपैकी 134 जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. मागील निवडणुकीपेक्षा पक्षाने दहा जागा जास्त मिळवल्या आहेत. आता महापौरपदी हकीम यांची निवड झाली आहे. कोलकता महापालिकेचे 39 वे महापौर म्हणून लवकरच ते शपथ घेतील. स्वांतत्र्यानंतर महापौरपदी विराजमान होणारे ते पहिले मुस्लिम ठरतील. हकीम हे महापालिकेच्या 82 क्रमांकाच्या वॉर्डमधून निवडून आले आहेत. ते कोलकता बंदर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. आमदार अतिन घोष यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT