Pooja Khedkar Sarkarnama
देश

Video Pooja khedkar : सततच्या आरोपांवर IAS पूजा खेडकर भडकल्या; म्हणाल्या...

Rajanand More

Mumbai : वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईचे ढग अधिक गडद होत चालले आहेत. आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत बोलताना त्यांनी चौकशी समितीसमोरच आपली बाजू मांडू, असे स्पष्ट केले आहे.

खेडकर या सोमवारी मीडियाशी बोलताना भडकल्याचेही पाहायला मिळाले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिमला बदली झाल्यानंतर त्यांनी तीन-चार वेळा मीडियाशी संवाद साधला. पण सोमवारी त्यांचा पार चढल्याचे दिसले. दोषी असल्याचे सिध्द होईपर्यंत आपण निर्दोष असल्याचे सूचक विधान त्यांनी केले.

काय म्हणाल्या पूजा खेडकर?

भारतीय संविधानानुसार दोषी सिध्द होईपर्यंत संबंधित व्यक्ती निर्दोष असते. मीडिया ट्रायलमधून मला दोषी ठरवले जात असून ते चुकीचे आहे. प्रत्येकाचा हा मुलभूत अधिकार आहे की, दोषत्व सिध्द होईपर्यंत तो निर्दोष असतो. त्यामुळे माझ्यावर झालेल्या आरोपांनंतर मला असे दोषी धरणे, हे बरोबर नाही, असे खेडकर यांनी स्पष्ट केले.

समितीसमोर मी माझे म्हणणे मांडेन. समिती जो निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य करावा लागेल. सध्या सुरू असलेल्या चौकशीवर बोलण्याचा मला अधिकार नाही. नंतर ते सर्वांसमोरच येईल, पण आता मी काहीच बोलू शकत नाही, असेही खेडकर यांनी स्पष्ट केले. खेडकर यांनी यूपीएससीकडे सादर केले दिव्यांगत्व व क्रिमिलेअर प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.

आई-वडील कुठे आहेत?

पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांच्य आई-वडिलांच्या शोध घेतला जात आहे. पण ते सापडत नाहीत. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. त्याबाबत मला काहीच कल्पना नाही, मी त्यावर बोलू शकत नाही, असे खेडकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT