CP Amitesh Kumar : चोरांची मोठी मजल! पोलिस आयुक्तांनाही सोडलं नाही; अखेर...

Online fraud has increased : आयुक्तांच्या फोटोसह बनावट डीपी तयार करून पैसे उकळण्याचा लावला होता धडका..
CP Amitesh Kumar
CP Amitesh KumarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करत पैशाची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बनावट माहितीमुळे आपल्या ओळखीतील कोणत्याही व्यक्तीची फसवणूक होऊ नये, यासाठी आयुक्त कुमार यांनी आपल्या व्हॉट्सॲपला स्टेटस् ठेवत याची माहिती दिली आहे.

इंटरनेट आणि सोशल मिडीयाचा वाढता वापर यामुळे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मोठ्या मोठ्या आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने बनावट खाते, मेसेज तयार करून तो व्हायरल केला जातो. या मेसेजमध्ये मी अडचणीमध्ये सापडलो आहे. काही पैशाची मदत पाहिजे, त्यासाठी या लिंकवर अथवा क्रमांकावर पैसे पाठवावे, असे आवाहन केले जाते. त्याद्वारे अनेकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

CP Amitesh Kumar
IAS Pooja Khedkar Update : खेडकर कुटुंबियांची पंकजा मुंडेंच्या ट्रस्टला लाखोंची देणगी; देवीला चांदीचा मुकूट !

सर्वसामान्य नागरिकांच्या मोबाईलवर सोशल मिडीयाच्या (Social Media) माध्यमातून असे फसवणुकीचे बनावट मेसेज पाठविले जातात. याला अनेक नागरिक बळी पडून संबधित मोबाईल क्रमांकावर तसेच लिंकवर पैसे पाठवितात आणि फसवणुकीला बळी पडतात. याबाबतच्या अनेक तक्रारी दररोज पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडे दाखल केल्या जातात. या तक्रारींची दखल घेत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो. मात्र त्याला यश मिळतेच असे नाही. रस्त्यावर घडणाऱ्या गुन्ह्यांपेक्षा (स्ट्रीट क्राईम) ऑनलाईनच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.

CP Amitesh Kumar
Cag Report : कॅगचे राज्य सरकारवर ताशेरे, म्हणाले महामंडळांना लावा कुलूप !

ओळखीच्या व्यक्तीचा फोटो, प्रोफाईल तयार करून पैसै मागण्याचा प्रकार सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत अनेकदा घडल्याचे समोर आले आहे. मात्र पुणे पोलिस (Police) आयुक्तांच्या बाबतीत देखील अशीच घटना घडली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करून पैशाची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे.

यामुळे कोणाचीही फसवणूक होऊ नये, यासाठी पोलिस आयुक्त कुमार यांनी या प्रकाराची माहिती आपल्या व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवत नागरिकांना दिली आहे. आपल्या नावाने खोट्या पद्धतीचे मेसेज पाठवून नागरिकांकडून पैशाची मागणी होत आहे. तरी अशा पद्धतीच्या कोणत्याही रिक्वेस्टला किंवा मेसेजला रिप्लाय करू नये अशी विनंती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com