Kolkata News : तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा या सध्या चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्यावर पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकसभेच्या नैतिकता पालन समितीने महुआ यांच्याविरोधात प्रस्ताव पारित केला आहे. त्यात नैतिकता पालन समितीने आपल्या प्रस्तावात महुआ यांना लोकसभतून निलंबित करण्याची शिफारस केली आहे.याचवेळी आता मोईत्रा यांच्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी जबाबदारी दिली आहे.
तृणमूलकडून नव्याने काही जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यात खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. पश्चिम बंगालच्या क्रिष्णनगरच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबतची माहिती महुआ मोईत्रा यांनीच ट्विटरवरून दिली आहे.
महुआ मोईत्रा म्हणाल्या,माझी क्रिष्णनगरच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांचे आभार मानते. क्रिष्णनगरच्या लोकांसाठी मी पक्षासोबत काम करत राहीन, असं त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.
पक्षाने नवीन नियुक्त्यांमध्ये त्यांचा समावेश केल्यामुळे हा मोईत्रा यांच्यासाठी मोठी जमेची बाजू असून, अद्याप पक्ष त्यांच्या बाजूने असल्याचं बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर मोईत्रा यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदासारखी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्याकडे तृणमूल काँग्रेसच्या खासदार मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेत अदानी समूहाला टार्गेट करण्यासाठी संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप करण्यात आला होता.
याआधी २ नोव्हेंबर रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत विरोधी पक्षातील सर्व सदस्यांनी सोनकर यांनी मोईत्रा यांचे दौरे तसेच त्यांनी मुक्काम केलेले हॉटेल आणि फोनवरील बोलण्यासंदर्भात मोईत्रा यांना अशोभनीय प्रश्न विचारल्याचा आरोप करत बैठक अर्ध्यातच सोडली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.