Supriya Sule Letter To Om Birla : खासदार सुनील तटकरेंना तत्काळ निलंबित करा; सुप्रिया सुळेंची आग्रही मागणी!

Supriya Sule Attack On Sunil Tatkare : "कायद्याचं उल्लंघन करूनही कारवाई नाही..."
Supriya Sule Letter To Om Birla ; Sunil Tatkare
Supriya Sule Letter To Om Birla ; Sunil TatkareSarkarnama
Published on
Updated on

Supriya Sule Letter To Om Birla : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे एक पत्र पाठवले आहे. रोहा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे समर्थक सुनील तटकरे यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. राज्य घटनेतील शेड्युल दहानुसार त्यांनी पक्ष आदेशाच्या विपरित वर्तन केल्याने त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, असे सुळे यांनी अध्यक्ष बिर्लांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. (Latest Marathi

Supriya Sule Letter To Om Birla ; Sunil Tatkare
PDCC Bank Byelection : पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी अजित पवार कोणाला संधी देणार?; पार्थ पवारांसह 'ही' तीन नावे चर्चेत

सुनील तटकरे यांच्या विरोधात पक्षविरोधी कृतीची याचिका करून आता जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटूनही गेला आहे. मात्र, अद्यापही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, अशी खंत सुळे यांनी व्यक्त केली आहे. तसेच यावरील कार्यवाही इतक्या कालावधीपासून प्रलंबित आहे, कार्यवाही केली जात नाही, यामुळे शेड्युल (सूची) दहाचे उल्लंघन होत आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केली आहे.

Supriya Sule Letter To Om Birla ; Sunil Tatkare
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सुप्रिया सुळे-जयंत पाटील घेणार राज्यपाल बैस यांची भेट

जुलै महिन्यात याचिका -

खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाविरोधात वर्तन केल्यामुळे त्यांना अपात्र ठरावण्यात यावे, यासाठी आमच्याकडून जुलै महिन्याच्या ४ तारखेला याचिका दाखल केली गेली होती. त्यावर अजूनही कार्यवाही केली गेली नाही. यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती खासदार सुळे यांनी केली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com