New Delhi News : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) त्यांच्यावरील 'कॅश फॉर क्वेरी' आरोपासंदर्भात संसदेच्या 'एथिक्स कमिटी'समोर हजर झाल्या होत्या. मात्र, कमिटीच्या बैठकीत गुरुवारी चांगलाच गदारोळ झाला. महुआ मोईत्रा यांच्यासह विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही सभात्याग केला. महुआ मोईत्रा यांना वैयक्तिक प्रश्न विचारण्यात आल्याने सभात्याग केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षाच्या खासदारांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तुम्ही किती वाजता भेटलात, कधी कोणाशी बोललात, हॉटेलमध्ये कोणाला भेटलात, असे प्रश्न मोईत्रा यांना विचारण्यात आल्याचे विरोधी सदस्यांनी सांगितले. ते गोपनीय असल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. मात्र, एक सदस्य सर्व माहिती देत होते, असे विरोधकांनी सांगितले. समितीची बैठक अर्धवट सोडून विरोधी पक्षाचे खासदार संतापाने बाहेर पडले. ते भाजपवर (BJP) टीका करत होते. महुआ मोईत्राही चांगल्याच भडकलेल्या दिसल्या.
बसपा (BSP) खासदार दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांचे खासदार संसदेच्या 'एथिक्स कमिटी'च्या बैठकीतून बाहेर पडले. महुआ मोईत्रा गुरुवारी त्यांच्यावरील 'कॅश फॉर क्वेरी' आरोपासंदर्भात संसदेच्या समितीसमोर हजर झाल्या होत्या. मात्र, या वेळी चांगलाच गोंधळ झाला.
जनता दल (युनायटेड) खासदार गिरीधारी यादव म्हणाले, "त्यांनी महिलेला (टीएमसी खासदार महुआ मोईत्रा) वैयक्तिक प्रश्न विचारले. त्यांना वैयक्तिक प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, म्हणून आम्ही बाहेर पडलो." काँग्रेस (Congress) खासदार उत्तम कुमार रेड्डी म्हणाले, "सर्व प्रश्नांवरून असे दिसते की ते एथिक्स कमिटीचे अध्यक्ष कोणाच्यातरी इशाऱ्यावर काम करत आहेत. हे खूप वाईट आहे. दोन दिवसांपासून आम्ही त्यांना काही गोष्टी विचारत आहोत... मात्र, त्यांनी काहीच उत्तर दिले नाही.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.