Kolkata Doctor rape and murder Case : कोलकाता पोलिसांनी रविवारी तृणमूल काँग्रेस खासदार सुखेंदु शेखर रॉय यांना समन्स बजावले. विशेष म्हणजे याच्या काही तास आधीच रॉय यांनी मागणी केली होती की, सीबीआयने कोलकाता पोलिस आयुक्त आणि आरजी कर मेडिकल कॉलेज व रुग्णालयाचे माजी प्राचार्यांची चौकशी करावी.
शासकीय आरजी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एक महिला डॉक्टरचा बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवला गेला आहे. रॉय यांनी याधी सीबीआयने निष्पक्ष कारवाई करावी, असे आवाहन केले होते. याचबरोबर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य तथा पोलिस आयुक्तांना ताब्यत घेऊन चौकशी करण्याची मागणी केली होती, जेणेकरून समजेल की आत्महत्या केल्याचे कोणी आणि का पसरवले?
पोलिसांच्या सूत्राने सांगितले की, कोलकाता पोलिसांनी रॉय यांना घटनेशी संबंधित कथितरित्या चुकीची माहिती पोस्ट केल्याबद्दल रविवारी सायंकाळी लालबाजार स्थित आपल्या मुख्यालयात अधिकाऱ्यांच्या समक्ष हजर होण्यास सांगितले होते.
या तर रॉय यांनी केलेल्या मागणीमुळेच त्यांना समन्स बजावले गेले का? अशी विचारणा केली गेली असता. सूत्रांकडून यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शवण्यात आला. परंतु असे सांगितले की, तृणमूल काँग्रेसचे खासदार रॉय यांनी काही दिवसांपूर्वी डॉक्टरच्या हत्येच्या तपासादरम्यान कोलकाता पोलिसांकडून संबंधित रुग्णालयात 'स्निफर डॉग'ला नेलं गेल्याबद्दल एक टिप्पणी केली होती.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.