Priyank Kharge News :'भाजपचे निम्मे नेते सहा महिन्यात तुरुंगात असतील किंवा..' ; प्रियांक खर्गेंचं मोठं विधान!

Priyank Kharge on Karnataka Governor : MUDA घोटाळा प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात खटला चालवण्यास राज्यपालांनी परवानगी दिल्याबद्दलही प्रियांक खर्गे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Priyank Kharge
Priyank KhargeSarkarnama
Published on
Updated on

Priyank Kharge on BJP : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी भाजपला एक इशारा दिला आहे. कर्नाटकातील निम्मे भाजप नेते पुढील सहा महिन्यांमध्ये तुरुंगात असतील किंवा जामीन मिळवण्यासाठी पळापळ करत असतील. काँग्रेस सरकार मागील भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाणार आहे. असं ते म्हणाले आहेत.

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी MUDA घोटाळा प्रकरणात कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या(Siddaramaiah) यांच्याविरोधात खटला चालवण्यास परवानगी दिल्याबद्दल प्रियांक यांनी म्हटले की, काँग्रेस कोणत्याही प्रकारचा जादू-टोना करत नाही. राज्य सरकारची पहिले प्राधान्य सुशासन आहे.

Priyank Kharge
Champai Soren : भाजपमध्ये प्रवेश करणार? दिल्लीत येताच चंपई सोरेन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार प्रियांक खर्गे(Priyank Kharge) यांनी रविवारी मीडियाशी बोलताना म्हटले की, एक सरकार म्हणून आमची पहिली प्राथमिकता एक कुशल शासन देणे आहे. जादूटोना करणे नाही. मात्र हो, आपण असं म्हणू शकतो की मागील सरकारमध्ये खूप विसंगती होती. त्यांनी म्हटले की, भाजप नेत्यांविरोधात 35 पेक्षा जास्त प्रकरणं आहेत आणि तीन ते चार प्रकरणांमध्ये अंतरिम रिपोर्ट सादर केला गेला आहे.

Priyank Kharge
Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांना जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या आधी मोठा झटका!

याशिवाय प्रियांक खर्गे यांनी म्हटले की, राज्य सरकारने गुन्हे तपास विभागाचे एक विशेष पथक तयार केले आहे. तसेच, आम्ही ही प्रकरणं गांभीर्याने बघत आहोत. आम्ही या प्रकरणांच्या मूळाशी जाऊ. यामध्ये वेळ लागू शकतो. मागील सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होता. आम्ही यावर काम करत होतो आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा आश्वासन देतो की, पुढील सहा महिन्यात निम्मे भाजप नेते जामिनासाठी पळापळ करतील किंवा तुरुंगात असतील.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com