CM Joseph Vijay And LTTE controversy Sarkarnama
देश

CM Joseph Vijay And LTTE controversy : प्रभाकरनच्या स्मरणामुळे तमिळनाडूच्या राजकारणात नवा वाद; मुख्यमंत्री विजय यांच्या पोस्टवरून भाजप आक्रमक

Joseph Vijay Mullivaikkal remembrance post sparks fresh political controversy over LTTE, Prabhakaran and Tamil sentiment in India and Sri Lanka : श्रीलंकेतील तमीळ नरसंहाराचा उल्लेख करत CM विजय यांची व्ही. प्रभाकरन याचे स्मरण करताच, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजप काँग्रेसविरोधात आक्रमक झाला आहे.

Pradeep Pendhare

Prabhakaran controversy India : तमिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री तथा ‘टीव्हीके’ पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी श्रीलंकेतील तमीळ नागरिकांच्या नरसंहाराचा उल्लेख करताना ‘एलटीटीई’चा प्रमुख व्ही. प्रभाकरन याचे स्मरण केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

विजय यांच्या ‘एक्स’ पोस्टनंतर भाजपने काँग्रेसवरही (Congress) जोरदार निशाणा साधला आहे.

18 मे 2009 रोजी श्रीलंकेच्या लष्कराने एलटीटीईविरोधातील अंतिम कारवाईत प्रभाकरनचा खात्मा केला होता. त्याच दिवशीची आठवण म्हणून जगभरातील तमीळ समाज ‘मुलीवैक्कल स्मरण दिन’ पाळतो.

या पार्श्वभूमीवर विजय (Thalapathy Vijay) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “मुलीवैक्कल नरसंहाराच्या जखमा आजही ताज्या आहेत. समुद्रापलीकडे राहणाऱ्या तमीळ बांधवांच्या हक्कांसाठी आम्ही कायम आवाज उठवत राहू.” विजय यांच्या या पोस्टमध्ये थेट प्रभाकरनचा उल्लेख नसला, तरी एलटीटीई संघर्षाच्या संदर्भामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.

26 वर्षांचा रक्तरंजित संघर्ष

श्रीलंकेत स्वतंत्र ‘तमिळ ईलम’च्या मागणीसाठी एलटीटीईने जवळपास 26 वर्षे सशस्त्र संघर्ष छेडला होता. या संघर्षात हजारो नागरिकांचा बळी गेला. भारतातही या संघटनेचे नाव माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर अत्यंत संवेदनशील मानले जाते.

भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

विजय यांच्या पोस्टनंतर भाजपने थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले. “एलटीटीईनेच तुमच्या वडिलांची हत्या केली होती, हे विसरू नका,” असा टोला भाजपकडून लगावण्यात आला. त्यामुळे या मुद्द्यावर राष्ट्रीय राजकारणातही नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

‘हा नरसंहाराच्या स्मरणाचा दिवस’

दरम्यान, विजय यांच्या TVK पक्षाने स्पष्टीकरण देताना म्हटले की, “मुलीवैक्कल दिन हा केवळ प्रभाकरनच्या मृत्यूचा दिवस नाही. हजारो निरपराध तमीळ नागरिकांच्या हत्येच्या स्मरणार्थ तो पाळला जातो.”

‘व्हीसीके’च्या पाठिंब्यामुळे चर्चांना उधाण

विजय सरकारला VCK या पक्षाचा पाठिंबा आहे. हा पक्ष एलटीटीई समर्थक भूमिकेसाठी ओळखला जात असल्याने विजय यांच्या पोस्टमागील राजकीय संदेशावर आता चर्चा रंगू लागली आहे.

तमिळनाडूत भावनिक मुद्दा, देशात राजकीय वाद

श्रीलंकेतील तमीळ नागरिकांचा प्रश्न तमिळनाडूत नेहमीच भावनिक मानला जातो. मात्र प्रभाकरन आणि एलटीटीईचा संदर्भ आल्यावर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दाही पुढे येतो. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांनी घेतलेली ही भूमिका पुढील काळात मोठ्या राजकीय वादाचे कारण ठरू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT