RSS Mini Nagpur Belapur : ‘मिनी नागपुरात’ थलपती विजयचा जलवा; राजकीय समीकरणं बदलणार?

Congratulatory banners Thalapathy Vijay appeared Belapur Shrirampur, popularly known RSS ‘Mini Nagpur’, after his massive victory Tamil Nadu Assembly elections : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर इथं तामिळनाडू इथं दणदणीत विजय मिळवलेल्या 'थलपती विजय' यांच्या अभिनंदनाचे झळकलेले फलक लक्षवेधी ठरला आहे.
Thalapathy Vijay
Thalapathy VijaySarkarnama
Published on
Updated on

Shrirampur political news : ज्या गावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 'मिनी नागपूर' म्हणून ओळखले जाते, जिथे प्रत्येक उंबरठ्यावर संघ विचारांचा पहारा आहे, अशा श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात तामिळनाडू इथं दणदणीत विजय मिळवलेल्या जोसेफ विजय चंद्रशेखर उर्फ 'थलपती विजय' यांच्या विजयाच्या एका फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य सुपरस्टार 'थलपती विजय' यांच्या अभिनंदनाचा फलक थेट गावाच्या मुख्य झेंडा चौकात झळकला असून, या 'राजकीय' वळणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील ​बेलापूरचा इतिहास हा संघनिष्ठेचा आहे. देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी या गावाला भेट दिली होती. विशेष म्हणजे, पढेगाव रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर वाजपेयी चक्क सायकलवर मागे बसून बेलापूरपर्यंत आले होते, ही आठवण आजही जुन्या पिढीच्या स्मरणात ताजी आहे.

आयोध्यातील श्रीराम मंदिर ट्रस्टचे खजिनदार गोविंददेवगिरी महाराज यांचे हे मूळ गाव! अनेक बड्या प्रचारकांनी या मातीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) पाळेमुळे घट्ट केली आहेत. अशा या 'भगव्या' बालेकिल्ल्यात अचानक तमिळनाडूच्या राजकारणाचे पडसाद उमटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Thalapathy Vijay
Thalapathy Vijay 180 seats claim : थलापती विजय साईचरणी नतमस्तक; लगेचच राजकीय बिगुल, ‘इतक्या’ जागा जिंकण्याचा दावा!

झेंडा चौकात लागलेल्या या फलकावर केवळ 'थलपती विजय' यांचा फोटो नाही, तर त्यांच्या हातात विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा दिसत आहे. संघ विचारांचा पगडा असलेल्या गावात एका अशा नेत्याचे स्वागत होणे, ज्यांची राजकीय भूमिका आणि विचारधारा वेगळ्या धाटणीची आहे, हे सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांचे संकेत मानले जात आहेत.

Thalapathy Vijay
MK Stalin strategy : स्टॅलिन यांचा ‘मास्टरस्ट्रोक’? थलपती विजय मुख्यमंत्री होण्यामागे 'डीएमके'ची गुप्त खेळी

​या फलकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावर शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये सर्व जाती-धर्मातील तरुणांचा आणि नागरिकांचा समावेश आहे. ​सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत हा फलक लावल्याने गावात 'सोशल इंजिनिअरिंग'ची नवी चर्चा सुरू झाली आहे.

ज्या गावात संघविचारांची जडणघडण पिढ्यानपिढ्या झाली, तिथे 'तमिळ' सुपरस्टारच्या विजयाचा गुलाल उधळला जाणे, ही घटना बेलापूरच्या बदलत्या सामाजिक आणि राजकीय वातावरणाची साक्ष देत आहे. आता हा 'थलपती'चा करिश्मा केवळ फलकापुरता मर्यादित राहतो की, बेलापूरच्या राजकारणात काही वेगळी वळणे घेतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

स्थानिक रहिवाशी सागर खरात यांनी, बेलापूर हे विचारांशी पक्के असलेले गाव आहे. पण तरुणाईला आता केवळ स्थानिकच नाही, तर राष्ट्रीय स्तरावरील नव्या नेतृत्वाचेही आकर्षण वाटू लागले आहे. 'थलपती विजय' यांचा फलक हे त्याचेच प्रतीक असावे, अशी प्रतिक्रिया दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com