Tamilnadu TVK: तामिळनाडूमध्ये ४ मे रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला अन् इतिहास घडला. कारण अभिनेता आणि आता राजकारणी बनलेल्या थलापती विजय याच्या टीव्हीके नावाच्या पक्षानं इथं सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत सत्ताच स्थापन केली. पण आता याच पक्षाची भुरळ इथल्या प्रमुख विरोधपक्षांनाही पडली आहे, कारण प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या AIADMK च्या तीन आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत थेट टीव्हीकेत प्रवेश केला आहे. यामुळं टीव्हीकेचं वजन वाढलं असून या पक्षाची इथं चांगलीच हवा असल्याचं सिद्ध झालं आहे.
AIADMKचे आमदार म्हणून नुकतेच निवडून आलेले मरगथम कुमारवेल, सत्यबामा आणि जयकुमार अशी त्यांची नाव आहेत. या तिन्ही आमदारांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत तो विधानसभा अध्यक्ष जेसीडी प्रभाकरन यांच्याकडं सोपवला. तामिळनाडू सरकारकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलं आहे. राजीनाम्यानंतर या तिन्ही आमदारांनी थेट टीव्हीकेचे नेते आणि मंत्री आढाव अर्जुन यांची भेट घेऊन त्यांच्याकडं आपला राजीनामा सोपवला. पण आता अभिनेता विजय यानं लढवलेली तिरुची पूर्व विधानसभेची जागा यांसह इतर तिघांच्या जागेवर आता पोटनिवडणूक लागणार आहे.
तामिळनाडूच्या विधानसभेत चार जागा रिक्त झाल्या असल्या आणि त्या ठिकाणी पोटनिवडणूक होणार असली तरी या चार पैकी तीन जागा या टीव्हीकेच्या नसल्यानं सरकारचं बहुमत कमी होत नाही. त्यामुळं सरकारचं संख्याबळ हे शाबूत असून उलट या नव्या तीन आमदारांनी पक्षात प्रवेश केल्यानं आता त्याच्या रिक्त जागांवर जर पुन्हे ते निवडून आले तर टीव्हीकेच्या जागांमध्ये तीन जागांची भरच पडणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.