Amit Shah Latest Marathi News, Yogi Adityanath News
Amit Shah Latest Marathi News, Yogi Adityanath News Sarkarnama
देश

Yogi Government : योगी सरकारमधील दोन मंत्री नाराज; अमित शहांकडे करणार तक्रार

सरकारनामा ब्युरो

लखनौ : काही महिन्यांपूर्वीच ऐतिहासिक विजय मिळवत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सत्ता काबीज केली. त्यानंतर आता मंत्रिमंडळातील नाराजीनाट्य समोर आले आहे. काँग्रेसमधून भाजपात (BJP) दाखल झालेले जितीन प्रसाद आणि दिनेश खाटीक हे मंत्री योगी सरकारच्या कारभारावर नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. (CM yogi Adityanath Latest News)

दिनेश खाटीक हे जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री आहेत. ते आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण योगींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. आपल्या आदेशाचे अधिकाऱ्यांकडून पालन होत नसल्याने खाटीक नाराज आहे. स्वतंत्र देव सिंह हे या विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत.

जितीन प्रसाद (Jitin Prasad) यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्रिपद आहे. त्यांचे ओएसडी अनिल कुमार पांडे यांच्या बदलीवरून प्रसात संतापले असल्याचे वृत्त आहे. पांडे यांना राज्यसेवेतून पुन्हा केंद्रीय सेवेत पाठवण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे, असं वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

दोन्ही मंत्र्यांचा फोन मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बंद येत होता. या महिन्याच्या सुरूवातीला योगी सरकारने प्रसाद यांच्या विभागाची झाडाझडती घेतली आहे. तीन सदस्यांच्या समितीने विभागातली बदल्यांमध्ये अनियमितता असल्याचा अहवाल दिला आहे. त्याचा ठपका पांडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे, असंही वृत्तात म्हटलं आहे.

या बदलीच्या पार्श्वभूमीवर जितीन प्रसाद हे बुधवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे समजते. या चौकशीबाबत ते शहा यांच्याकडे तक्रार करू शकतात. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला प्रसाद उपस्थित होते. पण त्यानंतर ते माध्यमांसमोर आले नाहीत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT