Shiv Sena News : शिंदे गटातील 37 बंडखोर आमदारांचा पराभव होणार?

शिंदे यांनी एक आमदार पडला तरी राजकारण सोडेन, अशी घोषणा केली आहे.
CM Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest Marathi News
CM Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी किती आमदार पुन्हा निवडून येणार, याबाबत महाराष्ट्रभरात चर्चा सुरू आहेत. शिंदे यांनी तर एकही आमदार पडू देणार नाही, असा निर्धार केला आहे. तर शिवसेनेचे (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह इतर नेत्यांनी बंडखोर आमदार पुन्हा निवडून येणार नाही, असं भाकित केलं आहे. (Shiv Sena Latest Marathi News)

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके (Hari Narke) यांनीही याबाबतचे ट्विट केले आहे. मित्राने केलेल्या सर्वेक्षणाचा हवाला नरके यांनी दिला आहे. शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी बहुतेक आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत, असं या सर्वेक्षण आढळून आल्याचे नरके यांनी म्हटलं आहे.

CM Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest Marathi News
100 कोटी द्या,मंत्री बनवतो : आमदारांना फसविणाऱ्या चौघांना अटक

'माझे एक निवडणूक सर्व्हे करणारे मित्र आहेत.त्यांचे अभ्यास 95% पर्यंत अचूक असल्याचे अनेक निवडणुकांमध्ये सिद्ध झालेले आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी शिंदे सेनेच्या 40 आमदारांच्या मतदारसंघात नमुना सर्व्हे केले असता 40 पैकी 37 आमदार पराभूत होतील. म्हणजे मुख्यमंत्री शिंदेसाहेब राजकारण सोडणार तर,' असं ट्विट नरके यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत आलेल्या 50 पैकी एक आमदार पडला तरी राजकारण सोडून गावाकडे शेती करायला जाणार असल्याची घोषणा केली आहे. उलट भाजपसोबत 200 आमदार निवडून आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता नेमका कुणाचा दावा खरा ठरणार, याचं उत्तर निवडणुकीतच मिळेल.

महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्वाचा

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सत्तापेचाबाबत सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या चार याचिकांवर सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असल्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष त्याकडे लागले आहे. शिंदे-फडणवीस सरकार आणि ठाकरेंसाठी ही सुनावणी अत्यंत महत्वाची असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com