MK Stalin, Udayanidhi  Sarkarnama
देश

Tamil Nadu Government : तामिळनाडूत आता वडील मुख्यमंत्री तर मुलगा उपमुख्यमंत्री; मंत्रिमंडळातही मोठे फेरबदल!

Mayur Ratnaparkhe

Tamil Nadu Deputy Chief Minister Udayanidhi : तामिळनाडू सरकारने मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारने राज्यपालांकडे युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना त्यांच्या सध्याच्या विभागांशिवाय योजना आणि विकास विभाग देण्यासोबतच उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. राज्यापलांनी ही शिफारस मान्य केली आहे. उदयनिधी हे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र आहेत.

तामिळनाडूचे राज्यपाल एमके स्टॅलिन यांनी राज्यपालांना उदयनिधी(Udayanidhi ) यांना उपमुख्यमंत्री पदावर नियुक्त करण्याची शिफारस करण्याबरोबरच , व्ही. सेंथिल बालाजी, डॉ. गोवी. चेझियान आणि आर राजेंद्रन, थिरु एसएम नासर यांना मंत्रिमंडळात सहभागी करण्याची शिफारस केली आहे.

नवी मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ रविवारी दुपारी साडेतीन वाजता चेन्नईतील राजवभवनात पार पडणार आहे. तामिळनाडू सरकारने नुकतेच सर्वोच्च न्यायालयातून जामीनावर सुटलेल्या सेंथिल बालाजी यांना पुन्हा एकदा कॅबिनेटमध्ये सहभागी करून घेतले आहे.

याशिवाय स्टॅलिन यांनी दूध आणि डेअरी विकासमंत्री टी.मानो थंगराज, अल्पसंख्याक कल्याण आणि गैर-निवासी तामिळ कल्याण मंत्री के.एस.मस्थान तसेच पर्यटनमंत्री के. रामचंद्रन यांना मंत्रिपरिषदेतून हटवण्याचीही शिफारस केली आहे. तर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांची ही शिफारस देखील मान्य केली आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन(MK Stalin) यांनी मंगळवारीच संकेत दिले होते की, उदयनिधी स्टॅलिन यांना राज्याचे उपमुख्यमंत्री बनवले जावू शकते आणि मंत्रिमंडळातही फेरबदल केले जाऊ शकतात.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT