Tamil Nadu Politics : मुख्यमंत्री स्टॅलिन मोठा निर्णय घेणार; मुलगा उदयनिधी बनणार उपमुख्यमंत्री?

MK Stalin : मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन फेब्रुवारी महिन्यात परदेश दौऱ्यावर...
MK Stalin, Udaynidhi
MK Stalin, UdaynidhiSarkarnama
Published on
Updated on

Udaynidhi : तमिळनाडूमध्ये सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. सत्ताधारी डीएमके पक्षाचे नेते व क्रीडा मंत्री उदयनिधी यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदीचा माळ पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रमुख विरोधी पक्षानेही त्याला दुजोरा दिला असून उदयनिधी हे 2026 च्या निवडणुकीत डीएमकेचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असे भाकितही वतर्वले आहे.

डीएमकेचे (DMK) सर्वेसर्वा व मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (MK Stalin) हे फेब्रुवारी महिन्यात परदेश दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधीच उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. स्टॅलिन परदेशात गेल्यानंतर उदयनिधीच वडिलांच्या जागी राज्याचा कारभार सांभाळतील, अशी शक्यता आहे. डीएमकेच्या युवक आघाडीची 21 जानेवारीला बैठक बोलावण्यात आल्याने याबाबत जोरात चर्चा सुरू आहे.

MK Stalin, Udaynidhi
India Aaghadi News : मोठी बातमी ! इंडिया आघाडी जागा वाटप बैठक 14 किंवा 15 जानेवारीला होणार ?

डीएमकेचे सचिव टीकेएस एलनगोवन यांनी अंतिम निर्णय स्टॅलिन यांचा असेल, असे सांगत ही शक्यता फेटाळून लावली नाही. मात्र, त्यांनी त्यावर थेट भाष्यही केले नाही. उदयनिधी हे पक्षात सक्रीय असल्याने त्यांना उपमुख्यमंत्री केल्यास काहीच चुकीचे नाही. त्याबाबतचा निर्णय केवळ मुख्यमंत्रीच घेतील, असे एलगोवन म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उदयनिधी यांनी मात्र ही अफवा असल्याचे म्हटले आहे. केवळ मुख्यमंत्रीच कोणताही निर्णय घेतील, असे ते म्हणाले आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एआयडीएमकेने ही अफवा नसून सत्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही हे मागील वर्षभरापासून म्हणत आहोत, जेव्हा त्यांना निवडणुकीत तिकीट देण्यात आले, असे एमआयडीएमकेच्या (AIDMK) नेत्यांनी म्हटले.

उदयनिधी यांना आधी तिकीट देण्यात आले. नंतर मंत्री करण्यात आले. आता ते उपमुख्यमंत्री होतील. तर 2026 च्या निवडणुकीत तेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील. घराणेशाहीचे डीएमके हा पक्ष उत्तम उदाहरण आहे. वडील, मुलगा, नातू आणि आता पणतू हेच फक्त पक्ष चालवण्यासाठी सक्षम आहेत. यावरूनच डीएमकेमध्ये लोकशाही नसल्याचे दिसते, अशी टीका प्रवक्ते कोवई सत्यन यांनी केली.

MK Stalin, Udaynidhi
Maratha Reservation : राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यावर फुली; बैठकीचं ठिकाण बदललं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com