BJP-Thackeray Politics : बावनकुळेंचे आव्हान; उदयनिधी स्टॅलिनबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी

Tamilnadu Politics : तामिळनाडूचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदू धर्म हद्दपार झाला पाहिजे, अशा पद्धतीचे वक्तव्य केले आहे.
Thackeray-Bawankule Politics
Thackeray-Bawankule PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Nagar Politics : इंडिया आघाडीत अनेक पक्ष आहेत. मात्र, प्रत्येक पक्षाची भूमिका ही वेगवेगळी आहे. यात इंडिया आघाडीची नेमकी भूमिका काय याचा कोणालाच तपास नाही. अशात तामिळनाडूचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदू धर्म हद्दपार झाला पाहिजे, अशा पद्धतीचे वक्तव्य केले आहे. मात्र, इंडिया आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आता उदयनिधी स्टॅलिन याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरमध्ये माध्यमांशी बोलताना दिले आहे.

इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हे अनेक पक्षांच्या हातात हात घालून सध्या बसलेले आहेत. मात्र, यामध्ये उदयनिधी स्टॅलिन हे पण त्यांच्यासोबत आहे. अशात उदयनिधी स्टॅलिन यांची येणारी वक्तव्यं ही हिंदू धर्मविरोधी आहेत. नेहमी हिंदुत्वाचा पुरस्कार करत असल्याचे सांगणारे उद्धव ठाकरे यांनी आता आपली याबाबत काय भूमिका आहे हे जनतेसमोर मांडलं पाहिजे, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली.

Thackeray-Bawankule Politics
Pimpri Chinchwad Politics : रोहित पवारांनी उद्योगनगरीत लक्ष घालताच गणेश मंडळांना अजितदादांच्या मॅरेथॉन भेटी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता केवळ देशात नाहीतर आज जगात पोहोचली आहे. त्यामुळेच 2047 पर्यंत नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारला कसलाही धोका नाही. यातूनच काँग्रेस पक्षामध्ये उदासीनता आल्याचे दिसून येत असून, त्यामुळे काँग्रेस पक्ष नेहमीप्रमाणेच जनतेला कन्व्हिन्स करण्याऐवजी जनतेमध्ये कन्फ्यूजन करण्याचा प्रकार करत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य करून जनतेला संभ्रमित करण्याचे काम काँग्रेस पक्ष आणि त्यांचे सहकारी इंडिया आघाडीतील पक्ष सध्या करताना दिसत आहेत, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

जालना जिल्ह्यात जरांगे पाटलांचे उपोषण राज्यात गाजले. जरांगे पाटील आता राज्याचा दौरा करणार असल्याची बातमी आहे. यावर म्हणाले की, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा अनेक वर्षे प्रलंबित असलेला मुद्दा चर्चेत आणला आहे. राज्यातील 13 कोटी जनतेच्या प्रतिनिधी पक्षाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे जरांगे पाटील आपली भूमिका मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, असे बावनकुळे म्हणाले.

Edited By- Anuradha Dhawade

Thackeray-Bawankule Politics
MLA Sanjay Shirsat On CM : भाजपला फडणवीस मुख्यमंत्री होतील वाटतात, आम्हाला पुन्हा शिंदेच हवेत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com