India Alliance Parliament Sarkarnama
देश

Union Budget 2024 : विरोधकांचा हल्लाबोल; बजेटवर चर्चेआधीच सरकारला घेरलं

India Alliance Congress Rahul Gandhi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात बिहार व आंध्र प्रदेश वगळता इतर राज्यांवर अन्याय केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Rajanand More

New Delhi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा एनडीए सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिल्या अर्थसंकल्पावर विरोधक प्रचंड नाराज झाले आहेत. बिहार व आंध्र प्रदेशवर निधीची बरसात केल्याने इतर राज्यांवर अन्याय झाल्याची भावना विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे.

अर्थसंकल्पावर बुधवारपासून संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा होणार आहे. त्याआधीच विरोधकांनी सरकारला हल्लाबोल केला आहे. अर्थसंकल्पाविरोधात इंडिया आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांनी संसदेबाहेर बुधवारी आंदोलन केले. या आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी नेते सहभागी झाले होते.

सरकारने अर्थसंकल्पात इतर राज्यांसोबत दुजाभाव केल्याचा रोष विरोधकांकडून व्यक्त केला जात आहे. हा अर्थसंकल्प केवळ सरकार वाचवण्यासाठी मांडल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे संसदेतही विरोधकांचा पवित्रा आक्रमक राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, सरकारने विरोधकांच्या या भूमिकेवर सरकारने जोरदार टीका केली आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू म्हणाले, हा अर्थसंकल्प सर्वांसाठी चांगला आणि स्वागतार्ह आहे. पायाभूत सुविधा उभारण्यासाठी करण्यात आलेली 11 लाख 11 हजार 111 कोटींची तरतूद केवळ एक-दोन राज्यांसाठी नाही. संपूर्ण देशासाठी आहे.

वैद्यकीय सुविधा, मध्यवर्गीय लोकांसाठी दिलेल्या सवलती, आदिवासी बांधवांसाठी दिलेले स्वतंत्र पॅकेज हे सर्व देशासाठी केले आहे. हा अर्थसंकल्प केवळ एक-दोन राज्यांसाठी आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. बिहार थोडा जास्त फायदा होत असेल, तर त्यात अडचण काय आहे, असा रिजिजू यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT