Nirmala Sitharaman Budget Speech Sarkarnama
देश

Union Budget 2024 Update : लांबलचक भाषणाचा रेकॉर्ड केलेल्या सीतारमण यांनी 57 मिनिटांतच का आटोपलं बजेट?

Nirmala Sitharaman : निर्मला सीतारमण यांनी 2020 मध्ये 2 तास 42 मिनिटांचे भाषण केले होते.

Rajanand More

New Delhi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरूवारी सकाळी अंतरिम बजेट सादर केले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे इलेक्शन बजेट सादर करताना सीतारमण कोणत्या घोषणा करणार, हे बजेट भाषण किती वेळ चालेल, याबाबतही अनेकांना उत्सुकता होती. कारण सीतारमण यांच्याच नावावर आतापर्यंतच्या सर्वात लांबलचक भाषणाचा रेकॉर्ड आहे. यावेळी मात्र त्यांनी केवळ 57 मिनिटांतच भाषण संपवलं. (Union Budget 2024 Update)

सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी 2020 मध्ये सर्वाधिक वेळ भाषण केले होते. एखाद्या बॉलीवूड चित्रपटापेक्षाही या भाषणाचा कालावधी अधिक होता. त्यांनी लोकसभेत (Lok Sabha) तब्बल 2 तास 42 मिनिटांचे भाषण केले होते. त्यानंतर मात्र बजेटचा कालावधी वर्षागणिक कमी होत गेला. 2020 चा रेकॉर्ड कायम आहे.

मोदी सरकारच्या (Modi Government) या टर्ममधील शेवटचे नियमित बजेट 2022 मध्ये सादर करण्यात आले. या बजेट भाषणाचा कालावधी 1 तास 25 मिनिटांचा होता. त्याआधीच्या बजेटचा कालावधी 1 तास 31 मिनिटे होता. मोदी सरकार 2019 मध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर सीतारमण यांनीच बजेट सादर केले होते. या बजेट भाषणाचा कालावधी 2 तास 17 मिनिटांचा होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी अर्थमंत्री जसवंत सिंह यांनी 2003 मध्ये 2 तास 42 मिनिटे भाषण करत रेकॉर्ड केला होता. हा रेकॉर्ड सीतारमण यांनी 2020 मध्ये मोडला. 2024 चे अंतरिम बजेटचा कालावधी केवळ 57 मिनिटांचा होता. या बजेटमध्ये संपूर्ण वर्षभरासाठी तरतूदी करणे, योजना जाहीर करता येत नाही. एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहे. त्यामुळे नवीन सरकार येईपर्यंतच्या कालावधीपुरतेच या बजेटचा विचार केला जातो. नवीन सरकार आल्यानंतर नियमित बजेट सादर केले जाते.

करामध्ये बदल नाही

सीतारमण यांनी करप्रणालीमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे नोकरदारवर्गाची काहीप्रमाणात निराशा झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर करामध्ये बदल होईल, असे अपेक्षित होते. त्याचप्रमाणे सीतारमण यांनी काही महत्वाच्या घोषणा करत महिला, तरूण, गरीबांसाठी योजना जाहीर केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT