केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम बजेट सादर केलं. या बजेटमधून देशाला काय मिळालं, असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे. तर निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर केलं म्हणजे नक्की काय केलं, याकडेही लक्ष वेधलं जात आहे.
येत्या दोन ते तीन महिन्यांत लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अंतरिम बजेट (Interim Budget 2024) आहे. निवडणूक होऊन नवीन सरकार स्थापन होईपर्यंतच्या खर्चाला मंजुरी देण्यासाठी याला लेखानुदान म्हटले जाते. त्यामुळे या बजेटमधून काही मिळण्याची अपेक्षा नव्हती. तरीही भाजपने (BJP) या संधीचा 'प्रचार' फायदा करून घेतला आहे.
बरोबर 11 वाजून 1 मिनिटांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी लेखानुदानाला सुरुवात केली. त्यांचं बजेटचं भाषण 11 वाजून 58 मिनिटांनी संपलं. त्यांच्या 57 मिनिटांच्या भाषणात पहिली 43 मिनिटं सरकारनं काय काय केलं, याचं गुणगाण होतं. हे भाजप गुणगाण संपल्यानंतर शेवटच्या 14 मिनिटांत त्यांनी लेखानुदान मांडलं.
सलग दोन वेळा पंतप्रधानपदी राहिलेल्या नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या 10 वर्षांच्या काळात देशाचा कसा विकास झाला, कोणत्या योजना राबवल्या, त्याचा किती लोकांना फायदा झाला, याचाच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लेखाजोगा मांडला. त्यामुळे हे ''भाजप गुणगाण' बजेट असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लेखानुदान मांडले. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या घोषणांची अपेक्षा नव्हतीच. मात्र, दशकभरात भाजपनं काय काय केलं, याचा पाढा वाचला. निर्मला सीतारमण यांनी भाजपचं रिपोर्ट कार्ड वाचलं, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
जीडीपीमध्ये वाढ, फाईव्ह ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेचं स्वप्न हे सगळं ठीक आहे. पण 80 कोटी गरीबांसाठी तुम्ही मोफत धान्य देत असल्याचा दावा करता म्हणजे देशात 80 कोटी गरीब आहे, हे वास्तव आहे, अशी बोचरी टीका बँकिंगतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी मोदी सरकारवर केली आहे.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.