Nirmala Sitharaman Sarkarnama
देश

Budget Session 2023 : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात,आज काय होणार?

Modi Government : मोदी सरकारचं हे अखेरचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार

सरकारनामा ब्यूरो

Union Budget Session 2023: केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज(दि.३१)पासून सुरुवात होत आहे. मोदी सरकारचं हे अखेरचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. तसेच मोदी सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पात दिलासा मिळणार की पुन्हा एकदा पदरी निराशा पडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी आज संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या अभिभाषण होणार आहे. यात त्या राष्ट्रपती मुर्मू (Droupadi Murmu) या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सभेला संबोधित करणार आहे. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवणार आहेत. आणि बुधवारी (दि.१) अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विशेष असणार आहे. मोदी सरकारचे हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. यात संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि सर्वसाधारण अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात येणार आहे. यादरम्यान, पंतप्रधान राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर आभार भाषण करणार आहेत.

महत्वाची बाब म्हणजे पहिल्या भागात कोणतंही विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडले जाणार नाही किंवा मंजूर केले जाणार नाही. 13 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत वैधानिक कामकाज होणार आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देणार आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन तब्बल ६६ दिवस सुरू राहणार आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात पार पडणार आहे. यातला पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत तर दुसरा टप्पा १३ मार्चपासून सुरू होणार आहे. याचदरम्यान, तर १४ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत सुट्टी असणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात काय महागणार आणि काय स्वस्त होणार याकडे नागरिकांचं लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT