New Delhi News : देशभरात फोफावत चाललेल्या ऑनलाईन सट्टेबाजी आणि जुगाराचा बाजाराविरोधात केंद्र सरकारनं धडाकेबाज पाऊल उचललं आहे. देशातील तरुण पिढी या गेमिंगच्या आहारी गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाधिनतेमुळे पालकांच्या नकळत मोठ्या रकमाही गमावल्याचं अनेकदा समोर आले आहे. तर काहीजण कर्जबाजारीच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळे मोदी सरकारने (Modi Government) ऑनलाईन गेमिंगवर प्रतिबंध घालण्यासाठी धडक कारवाई केली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता.19)ऑनलाइन गेमिंगचे नियमन करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे. हे विधेयक बुधवारी(ता.20) लोकसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या बैठकीत बेटिंग ॲपचे नियमन करणे आणि जुगारावर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी ऑनलाइन गेमिंग (Online Game) विधेयकाला मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. आता ऑनलाइन गेमिंग ॲप,वेबसाईटना कायदेशीर चौकटीत आणण्याचा आणि डिजिटल ॲप्सद्वारे खेळल्या जाणाऱ्या जुगारावर दंड आकारण्याची तरतूद या विधेयकात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली चालणारा जुगार, सट्टेबाजी रोखण्यासाठी सरकारकडून बारकाईने देखरेख ठेवली जात आहे. ऑक्टोबर 2023 पासून,ऑनलाइन गेमिंगवर तब्बल 28 टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. तर 2024-25 या आर्थिक वर्षापासून गेममधून मिळालेल्या विजयावर 30 टक्के जीएसटी आकारण्यात आला आहे.
सरकारने 2022 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान 1,400 हून अधिक बेटिंग आणि जुगार वेबसाइट्स आणि ॲप्सवर बंदी घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावित विधेयकामुळे ऑनलाइन सट्टेबाजीवर देखील बंदीची परवानगी सरकारला मिळणार आहे.
ऑनलाईन गेमिंगवर नियंत्रणासाठीच्या या प्रस्तावित विधेयकामध्ये ऑनलाईन गेमिंग वेबसाईट,ॲप्सचा वापर करून खेळणाऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी नियामक नेमण्याची तसेच ऑनलाइन गेमिंगबद्दल राज्यांच्या कायद्यांमधील विसंगती दूर करण्याची,दंड आकारणी आणि शिक्षा देण्याची तरतूदही या विधेयकात असल्याचं सांगण्यात येत आहे.
यासाठी इलेक्ट्रॉनिक्स व माहिती - तंत्रज्ञान मंत्रालयाला ऑनलाइन गेमिंगसाठी केंद्रीय नियामक म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगवर प्रतिबंध घालण्यासाठी मोठं पाऊल टाकलं आहे. आता केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगसंबंधात नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील वाईट प्रकाराला आळा बसणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.