Nitin Gadkari: 'मोदींना निवृत्त करावं अन् 2014 ला कट रचून 'PM'पदाची संधी हिरावलेल्या गडकरींना...'; बड्या नेत्याचं सरसंघचालक भागवतांनाच पत्र

Modi stepping down 75 years: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या पत्रकार परिषदांमधून सातत्याने 2025 च्या सप्टेंबर महिन्यात दिल्लीत मोठ्या घडामोडी घडणार असल्याचा दावा केला आहे.
Nitin gadkari, Mohan bhagwat, narendra Modi
Nitin gadkari, Mohan bhagwat, narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमी:

  1. शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून नरेंद्र मोदींनी ७५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधानपद सोडावे व नितीन गडकरींना संधी द्यावी अशी मागणी केली.

  2. तिवारी यांनी मोदींच्या कामगिरीची दखल घेतली, पण २०१२ मध्ये गडकरींची पंतप्रधान होण्याची संधी हिरावली गेल्याचा कट झाला होता असा गौप्यस्फोट केला.

  3. संजय राऊत यांनीही सप्टेंबर २०२५ मध्ये दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी होतील असा दावा केल्याने मोदी पायउतार होतील का यावरून चर्चांना उधाण आलं आहे.

Nagpur News : नागपूरमधील एका कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडली की, दुसर्‍यांना संधी दिली पाहिजे,असं सूचक विधान केलं होतं. त्यामुळे मोदींच्या पंतप्रधान पदावरुन पायउतार होण्याच्या चर्चा पुन्हा जोर धरु लागल्या होत्या. याचदरम्यान, आता एका नेत्यानं थेट सरसंघचालकांनाच पत्र लिहित मोदींना पायउतार करुन नितीन गडकरींना (Nitin Gadkari) पंतप्रधान करण्याची मागणी केली आहे. (Farmer leader Kishor Tiwari has written to RSS chief Mohan Bhagwat demanding Narendra Modi’s retirement at 75 and urging that Nitin Gadkari, who was denied the PM post in 2014, be given the opportunity to lead as Prime Minister)

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 सप्टेंबर 2025 रोजी 75 वर्षे पूर्ण करत आहेत.त्यामुळे वयाच्या पंच्याहत्तरीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी कायम राहणार की पायउतार होणार,यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता पुन्हा पंतप्रधान बदलण्याच्या चर्चांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना खुले पत्र लिहित मोठी खळबळ उडवून दिली आहे. या पत्रात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना 75 वर्ष पूर्ण होत असल्याने निवृत्त करावे. त्यानंतर 2014 मध्ये पंतप्रधानपदाची संधी हिरावलेल्या नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची संधी द्यावी,अशी मागणी तिवारी यांनी सरसंघचालक भागवतांकडे केली आहे.

Nitin gadkari, Mohan bhagwat, narendra Modi
Vice President Election update : मोदी-शहांनी राजकीय शत्रूचं मन वळवलं, पण काँग्रेसच्या 'मास्टरस्ट्रोक'नं सगळं फिस्कटणार? 'NDA'ची डोकेदुखी वाढली...

तिवारी म्हणाले, राज्यात भाजप सरकार असताना आपल्याला शेतकरी स्वावलंबन उच्चाधिकार मिशनचे अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रीचा दर्जा देण्यात आला होता. आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक जुने ‘संघटन शिबिर प्रशिक्षित स्वयंसेवक असल्यानं हे पत्र लिहित असल्याचंही तिवारी यांनी यावेळी स्पष्ट केले.

यवतमाळ जिल्ह्यात मागील 40 वर्षापासून आदिवासी व वंचित शेतकऱ्यांसाठी काम करत असून माझे वडील पंडीत जमुनाशंकर तिवारी गुरुजी संघ जनसंघाचे 1962 पासुन पूर्णवेळ प्रचारक होते.ते 19 महीने नाशिक येथे मध्यवर्ती कारागृहात होते,अशी आठवणही पत्रात करुन दिली आहे.

Nitin gadkari, Mohan bhagwat, narendra Modi
Solapur DCC Bank Case : तीन माजी आमदारांसह नऊ बड्या नेत्यांना सहकार मंत्र्यांची नोटीस; उद्याच्या सुनावणीसाठी हजार राहण्याची सूचना

देशाने मोदी यांना 11 वर्षे काम करण्याची संधी दिली.मोदी यांनी प्रभु रामचंद्राचे भव्य मंदिरासह अनेक चांगली कामेही केली. 2012 मध्ये काही नेत्यांनी बोगस बिनबुडाच्या घोटाळ्याचा आरोप करणारा कट रचून नितीन गडकरी यांच्या पंतप्रधान पदाची संधी हिरावली होती. या सर्व गोष्टी नितीन गडकरींना आपण 14 डिसेंबर 2012 ला सांगितल्याचा गौप्यस्फोटही किशोर तिवारी यांनी यावेळी केला.

यावेळी किशोर तिवारी यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व प्रकाश जावडेकर यांच्याबाबतही धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणाले, पक्षशिस्त आणि अभूतपूर्व संयमामुळे गडकरी त्यावेळी शांत राहिले होते. पण या कटात सहभागी असलेले अडवाणी व जावडेकर सध्या जिवंत असून ते सत्य जगाला सांगतील व नितीन गडकरी यांची माफी मागतील,असा आशावादही तिवारी यांनी बोलून दाखवला.

Nitin gadkari, Mohan bhagwat, narendra Modi
CSDS Apology: महाराष्ट्रातील मत चोरीची आकडेवारी जाहीर करणाऱ्या 'लोकनीती सीएसडीएस'च्या संचालकांचा माफीनामा; म्हणाले, घोडचूक...

किशोर तिवारी यांनी मोहन भागवत यांना लिहिलेल्या पत्राद्वारे नितीन गडकरी यांची कार्यसम्राट व सर्वांना घेऊन चालणारे मंत्री म्हणून ख्याती आहे.त्यांना सर्वदूर मान्यता असल्याचा दावाही केला आहे.त्याचमुळे त्यांना 2029 च्या लोकसभा निवडणुका पूर्वी उरलेली चार वर्ष देशाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी व देशाला त्यांचे नेतृत्वात पुढे नेण्यासाठी एक सकारात्मक बदल घडवून आणण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी यावेळी 2019 मध्ये सुद्धा नितीन गडकरी यांना पंतप्रधान करण्यासाठी आग्रही मागणी आपण उचलून धरल्याचं सांगितलं.परंतु त्यावेळी मोदी-शहा लॉबीनं 292 जागा मिळाल्यानं मलाच भाजप सोडण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोपही तिवारी यांनी यावेळी केला.

तसेच मोदी-शहा राजवट हुकुमशाहीनं वागत असून गेल्या 11 वर्षांत विरोधकांची मुस्कटदाबी सुरू असल्याची धारणा संपूर्ण जगभरात झाल्याचा धक्कादायक दावाही तिवारी यांनी केला. याचमुळे देशात आता नेतृत्व बदल हवा असल्याचं त्यांनी सरसंघचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Nitin gadkari, Mohan bhagwat, narendra Modi
Kolhapur Circuit Bench : 'गोकुळ'चे संचालक मंडळ बरखास्त करा; कोल्हापूर सर्किट बेंचकडे आलेल्या पहिल्याच याचिकेने जिल्ह्यात खळबळ

संजय राऊत यांचा मोठा दावा...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या पत्रकार परिषदांमधून सातत्याने 2025 च्या सप्टेंबर महिन्यात दिल्लीत मोठ्या घडामोडी घडणार असल्याचा दावा केला आहे. याचमुळे सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार होतील,असे आडाखे विरोधक बांधू लागले.त्यानंतर नरेंद्र मोदी खरंच सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान पदावरून पायउतार होणार का,असा प्रश्न दिल्लीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला.

प्र.1: किशोर तिवारी यांनी कोणती मागणी केली?
उ: नरेंद्र मोदींना 75 वर्ष पूर्ण झाल्यावर पायउतार करून नितीन गडकरींना पंतप्रधान करण्याची मागणी केली.

प्र.2: 2012 मधील कोणता दावा तिवारींनी केला?
उ: नितीन गडकरींची पंतप्रधान होण्याची संधी अडवण्यासाठी कट रचला गेला होता, असा दावा केला.

प्र.3: मोदींनी किती वर्षे पंतप्रधान म्हणून काम केले आहे?
उ: नरेंद्र मोदींनी आतापर्यंत 11 वर्षे पंतप्रधानपद सांभाळले आहे.

प्र.3: सप्टेंबर 2025 संदर्भात संजय राऊत यांनी काय भाकीत केले?
उ: सप्टेंबरमध्ये दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी होऊन मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार होतील असा अंदाज व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com