Union Home Minister Amit Shah's meeting with President Droupadi Murmu has intensified speculation over an upcoming Union Cabinet reshuffle and key ministerial changes. Sarkaranama
देश

Union Cabinet Reshuffle : केंद्रात राघव चढ्ढा अन् शिवसेनेला मोठं बक्षिस मिळणार? अमित शहांनी राष्ट्रपतींची भेट घेताच ठरला मंत्रिमंडळातील फेरबदलाचा दिवस

Amit Shah's meeting with President Droupadi Murmu : मागील काही कालावधीत देशातील राजकीय गणित पूर्णपणे बदललं आहे. एकीकडे पश्चिम बंगालमधील निकाल आणि त्यानंतर टीएमसीमधील फुटीर खासदार, महाराष्ट्रातील ठाकरेंच्या खासदारांनी केलेलं बंड या सर्व घडामोडी पाहता केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लावत या बंडखोरांना बक्षीस दिलं जाण्याची शक्यता आहे.

Jagdish Patil

Union Cabinet reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू असानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी (ता.२५) राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर दोनच दिवसांनी शहांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, या भेटीनंतर आता रविवारी किंवा सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यताआहे. भाजपने काही मंत्र्यांना राज्यसभेवर पुन्हा उमेदवारी न देता त्यांच्यापैकी काहींना आगामी विधानसभा निवडणुका पाहता त्यांना संबंधित राज्यांमध्ये संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवाय मागील काही कालावधीत देशभरातील राजकीय गणितं पूर्णपणे बदलली आहेत. एकीकडे पश्चिम बंगालमधील निकाल आणि त्यानंतर टीएमसी मधील फुटीर खासदारांसह महाराष्ट्रातील ठाकरेंच्या खासदारांनी केलेलं बंड, या सर्व घडामोडी पाहता केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लावत या बंडखोरांना बक्षीस दिलं जाण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलात पुढील नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव शक्तिकांत दास यांचा समावेश होऊ शकतो; त्यांना पूर्ण कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर निर्मला सीतारामन यांची मानव संसाधन विकास (HRD) मंत्रालयात बदली होण्याची शक्यता आहे.

धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप पुरी यांना मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते. तर दुसरीकडे एनडीएच्या (NDA) गोटात सहा खासदार आणल्याबद्दल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बक्षीस मिळू शकते. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

तर पंजाबमधील 'आप' सोडून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना बक्षीस दिले जाईल. खासकरून राघव चढ्ढा आणि अशोक मित्तल यांच्यापैकी एकाला मंत्रिपद निश्चित दिलं जाणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, नितीश कुमार यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडील आरोग्य राज्यमंत्रीपद काढून घेतले जाऊ शकते; हे पद संजय दिना पाटील यांना दिले जाऊ शकते अशीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता आगामी दोन दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT