Emergency 1975 : अटलजींचा ‘पोस्टमन’ राहायचा या छोट्याशा गावात; आणीबाणीत उद्ध्वस्त झाले कुटुंब, पण याच गावाने भाजपला दिला पहिला खासदार!

The untold story tiny Maharashtra village that shaped Jana Sangh politics, connected with Atal Bihari Vajpayee, and gave BJP first MP from region : अटल बिहारी वाजपेयीचे ‘पोस्टमन’, आणीबाणीतील संघर्ष आणि भाजपचा पहिला खासदार देणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील मळेगावथडी गावाची थक्क करणारी कहाणी.
Atal Bihari Vajpayee
Atal Bihari VajpayeeSarkarnama
Published on
Updated on

Kopargaon political history : अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजकारणाशी थेट जोडले गेलेले! जनसंघाच्या इतिहासात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे एक छोटेसे गाव म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मळेगावथडी!

अवघी अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने एकेकाळी असा राजकीय डाव मांडला होता, ज्याची चर्चा थेट दिल्लीपर्यंत झाली होती. विशेष म्हणजे, जनसंघाला पहिला जिल्हाध्यक्ष आणि पुढे भाजपला या मतदारसंघातील पहिला खासदार देण्याचा मानही याच गावाने मिळवला!

या संपूर्ण इतिहासाच्या केंद्रस्थानी होते गावातील प्रगतशील बागायतदार कृष्णराव बडदे! त्यांनी गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनसंघ यांची पाळेमुळे रोवली. त्या काळात जिल्हाभर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व असताना मळेगावथडी ग्रामपंचायत मात्र जनसंघाच्या ताब्यात होती. कृष्णराव बडदे तब्बल सलग 15 वर्षे सरपंच राहिले. गावातील सहकारी सेवा संस्थेलाही त्यांनी ‘संघशक्ती’ असे नाव दिले. ही संस्था शेतकऱ्यांना कर्ज देण्याबरोबरच किराणा आणि कापड दुकानही सहकारी तत्त्वावर चालवत होती.

एकदा जनसंघाच्या मेळाव्यासाठी अटल बिहारी वाजपेयी कोपरगाव (Kopargaon) रेल्वे स्थानकावर आले होते. त्यावेळी कृष्णराव बडदे आणि रामभाऊ चंद्रे हे कार्यकर्त्यांसह सायकलवर स्वागतासाठी उपस्थित होते. मात्र ऐनवेळी अटलजी स्वतः रामभाऊ चंद्रे यांच्या सायकलवर बसले आणि त्यांची ती सायकलवारी संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली. त्या काळात हा प्रसंग जनसंघासाठी मोठा प्रेरणादायी क्षण मानला गेला.

Atal Bihari Vajpayee
Sujay Vikhe Targets : पदाचा माज करू नका, आम्ही आहोतच..; डॉ. सुजय विखेंचा थेट इशारा, राजकारणात नवा संघर्ष पेटणार?

जनसंघाचा दिवा घरोघरी पोहोचवायचा

1972 च्या निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातून जनसंघाला उमेदवारच मिळत नव्हता. त्यावेळी कृष्णराव बडदे रामभाऊ चंद्रेंना घेऊन मुंबईत अटलजींकडे पोहोचले. अटलजींनी रामभाऊंना निवडणूक लढवण्यास सांगितले. मात्र रामभाऊंनी जनसंघाची ताकद अत्यंत कमी असल्याचे सांगितले. त्यावर अटलजींनी ऐतिहासिक शब्द उच्चारले, रामभाऊ, तुम्ही जनसंघाचे आणि माझे पोस्टमन आहात. आपल्याला जिंकायचे नाही, फक्त जनसंघाचा दिवा घरोघरी पोहोचवायचा आहे. या निवडणुकीत रामभाऊंनी केवळ दोन टक्के मतदारांपर्यंत का होईना, पण जनसंघाचा विचार पोहोचवला.

Atal Bihari Vajpayee
Thalapathy Vijay Big Economic Push : थलपती विजय सरकार 93 हजार नोकऱ्या देणार; तामिळनाडूसाठी काय आहे प्लॅन

आणीबाणी अन् बडदे बंधूंना अटक

25 जून 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू झाली आणि मळेगावथडीतील बडदे कुटुंबावर संकट कोसळले. कृष्णराव बडदे, उत्तमराव बडदे आणि ॲड. भीमराव बडदे या तिघांनाही अटक करण्यात आली. या अटकेनंतर त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आणि गावात अनेक वर्षे उभारलेला जनसंघाचा मजबूत पाया अक्षरशः हादरला. विचारसरणीसाठी केलेल्या संघर्षाची मोठी किंमत या कुटुंबाला मोजावी लागली.

भाजपचा पहिला खासदार

काळ बदलला, जनसंघाचे रूपांतर भाजपमध्ये झाले. आणि एक दिवस असा आला की कुणाच्याही ध्यानीमनी नसताना ॲड. भीमराव बडदे खासदार बनले. त्यामुळे अटलजींचे पोस्टमन, जनसंघाचा पहिला जिल्हाध्यक्ष आणि भाजपचा पहिला खासदार देणारे गाव अशी मळेगावथडीची ऐतिहासिक ओळख कायमची तयार झाली. या संपूर्ण संघर्षमय इतिहासाच्या केंद्रस्थानी होते दिवंगत कृष्णराव बडदे! ज्यांनी एका छोट्याशा गावातून विचारसरणीची मशाल पेटवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com