Vishwas Nangare Patil : RSSचं कौतुक विश्वास नांगरे-पाटलांना भोवणार? काँग्रेसने सरकारला थेट विचारले 6 सवाल

Congress targets IPS officer Vishwas Nangare Patil after viral RSS speech, demands immediate probe from Maharashtra government : RSSच्या मंचावर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी जात संघाचे गुणगान केल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच, काँग्रेसने गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चौकशीची मागणी केली आहे.
Congress vs Vishwas Nangare Patil
Congress vs Vishwas Nangare PatilSarkarnama
Published on
Updated on

Vishwas Nangare Patil RSS Video : राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील पुन्हा एकदा मोठ्या राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

समाजात द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या संघटनेचे सार्वजनिक व्यासपीठावर जाऊन कौतुक केल्याचा आरोप करत काँग्रेसने नांगरे-पाटील यांना थेट लक्ष्य केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनंतर आता या संपूर्ण प्रकरणाने राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे.

विशेष म्हणजे, नागपूर पोलिस आयुक्तपदी बदली झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी नांगरे-पाटील यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. प्रदेश काँग्रेसच्या (Congress) अधिकृत ट्विटर हँडलवरूनही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला, त्यामुळे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘हिंदू संमेलन 2026’ या कार्यक्रमात बोलताना विश्वास नांगरे-पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), हिंदुत्व आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. यानंतर काँग्रेसने गंभीर आक्षेप घेत, भारतीय संविधानाची शपथ घेऊन सेवेत असलेला आयपीएस अधिकारी एका विशिष्ट विचारसरणीचे सार्वजनिक समर्थन कसे करू शकतो? असा सवाल उपस्थित केला आहे.

Congress vs Vishwas Nangare Patil
Emergency 1975 : अटलजींचा ‘पोस्टमन’ राहायचा या छोट्याशा गावात; आणीबाणीत उद्ध्वस्त झाले कुटुंब, पण याच गावाने भाजपला दिला पहिला खासदार!

काँग्रेसने थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत नांगरे-पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खाकी वर्दीतला अधिकारी की संघाचा प्रचारक? असा थेट सवाल करत काँग्रेसने सरकारवरही दबाव वाढवला आहे.

Congress vs Vishwas Nangare Patil
Devendra Fadnavis on Sanjay Patil : पत्रकारांना मारून टाकेल..! एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराच्या धमकीवर देवाभाऊ संतापले; 'खाकी'तून उत्तर देण्याची तयारी!

काँग्रेसचे सरकारला थेट 6 सवाल

या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसने ऑल इंडिया सर्व्हिस रूल्सचा दाखला देत सरकारसमोर सहा महत्त्वाचे प्रश्न ठेवले आहेत. विश्वास नांगरे-पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राज्य सरकार किंवा गृहविभागाची पूर्वपरवानगी घेतली होती का? सेवेत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने एखाद्या विशिष्ट वैचारिक संघटनेच्या मंचावर जाऊन त्या विचारसरणीचे समर्थन करणे नियमांमध्ये बसते का? संघाच्या मंचावर सार्वजनिक भाषण करून विचारसरणीचे कौतुक करणे ही प्रशासकीय तटस्थता मानली जाऊ शकते का? संविधानिक पदावर असलेल्या अधिकाऱ्याने एका विचारधारात्मक संघटनेचे सार्वजनिक गुणगान करणे योग्य आहे का? अशा भूमिकेमुळे भविष्यात त्या अधिकाऱ्याच्या निर्णयांवर विशिष्ट विचारधारेचा प्रभाव पडणार नाही, याची हमी कोण देणार? संघाच्या व्यासपीठावर जाऊन सार्वजनिकरित्या समर्थन करणे हे ‘association’ म्हणून नियमभंगात मोडत नाही का?

काँग्रेसकडून चौकशीची मागणी

काँग्रेसने स्पष्टपणे म्हटले आहे की हा प्रश्न केवळ विश्वास नांगरे-पाटील यांच्यापुरता मर्यादित नाही. हा मुद्दा भारतीय प्रशासकीय व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा, संविधानाच्या सर्वोच्चत्वाचा आणि खाकी वर्दीच्या तटस्थतेचा आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, कार्यक्रमासाठी घेतलेल्या परवानग्या सार्वजनिक कराव्यात आणि ऑल इंडिया सर्व्हिस रूल्सचे उल्लंघन झाले आहे का, याबाबत सरकारने तातडीने स्पष्टता द्यावी, अशी ठाम मागणी काँग्रेसने केली आहे.

वाद चिघळण्याची शक्यता

दरम्यान, नांगरे-पाटील यांच्या या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com