Kangana Ranaut, Chirag Paswan Sarkarnama
देश

Video Kangana Ranaut : संसदेच्या पायऱ्यांवर गळाभेट, हातात हात..! कंगना अन् चिराग यांची अजब केमेस्ट्री!

Rajanand More

New Delhi : हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौत सातत्याने चर्चेत आहे. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीला जाताना चंदीगड विमानतळावर एका महिला गार्डने कानिशिलात लगावली होती. आता संसदेत आल्यानंतर पुन्हा ही खासदार अभिनेत्री चर्चेत आली आहे.

18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अध्यक्षांची निवडणूक होणार होती. त्यासाठी कंगना संसदेत आली होती. त्याचवेळी बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान पुढे तिला पाहून वाट पाहत थांबले होते.

काय आहे व्हिडिओमध्ये?

कंगना आणि चिराग यांनी संसदेच्या पायऱ्यांवर गळाभेट घेतली. काही सेकंद एकमेकांशी बोलतात आणि एकमेकांना हसतहसत टाळी देतात. नंतत हातात हात घालून दोघेही संसदेत जातात. हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होता आहे.

पहिली भेटही होती चर्चेत

लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएची पहिली बैठक जुन्या संसद भवनात झाली होती. यावेळीही कंगना आणि चिराग यांची भेट झाली होती. दोघांनीही गळाभेट घेत एकमेकांशी बराचवेळ गप्पा मारल्या होत्या. दोघांमधील मनमोकळ्या गप्पांचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यामुळे दोघांमधील केमिस्ट्रीची चर्चा बुधवारीही सोशल मीडियात रंगली आहे.

चित्रपटात एकत्र काम

चिराग पासवान यांनी आपल्या पहिल्या चित्रपटा कंगना रनौतसोबत काम केले होते. सुमारे 13 वर्षांपुर्वी या दोघांचा चित्रपट आला होता. मिले ना मिले हम, हे चित्रपटाचे नाव होते. त्यामध्ये चिराग आणि कंगनाची प्रमुख भूमिका होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT