Lok Sabha Session Live : लोकसभेत 'आणीबाणी' अन् क्षणात बदललं वातावरण; विरोधक अध्यक्षांवर तुटून पडले...

Lok Sabha Speaker Om Birla NDA Government INDIA Alliance : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ओम बिर्ला यांचे सर्वपक्षीय नेत्यांनी स्वागत गेले. काहींनी त्यांचे तोंडभरून कौतुकही केले.
Lok Sabha Speaker Om Birla
Lok Sabha Speaker Om BirlaSarkarnama

New Delhi : लोकसभेमध्ये बुधवारी नवीन अध्यक्षांची निवड झाल्यानंतर खेळीमेळीच्या वातावरणात सदस्यांकडून ओम बिर्ला यांचे स्वागत करण्यात आले. अनेकांनी त्यांचे कौतुकही केले. मागील सरकारच्या अखेरच्या अधिवेशनातील सदस्यांच्या निलंबनाचा मुद्दा काढत काही सदस्यांनी खोचक टोलाही लगावला.

सदस्यांची भाषणे झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांचा परिचय करून दिला. तोपर्यंत सभागृहातील सर्वच शांतपणे बसून कामकाज पाहत होते. पण बिर्लांनी एक शब्द उच्चारला अन् अचानक गदारोळ सुरू झाला. शांत बसलेले विरोधी बाकांवरील सदस्यांनी उठून उभे राहत घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्षांविरोधातही नारे दिले.

नेमकं काय घडलं?

मोदींनी मंत्र्यांचा परिचय करून दिल्यानंतर बिर्ला यांनी अचानक आणीबाणीचा उल्लेख करत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व काँग्रेस सरकारवर आसूड ओढण्यास सुरूवात केली. हे ऐकून विरोधकांनाही धक्का बसला. त्यामुळे विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनीही मग त्याविरोधात घोषणा सुरू केल्या.  

Lok Sabha Speaker Om Birla
Lok Sabha Speaker Election : लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड

काय म्हणाले ओम बिर्ला?

ओम बिर्ला यांनी आणीबाणीचा उल्लेख करताना सांगितले की, आणीबाणी हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय होता. हे सभागृह आणीबाणी लादण्याच्या त्या निर्णयाची निंदा करत आहे. त्याचप्रमाणे त्यावेळी आणीबाणीला विरोध आणि संघर्ष करणाऱ्या तसेच लोकशाहीच्या रक्षणाचे कर्तव्य पार पाडणाऱ्या सर्व लोकांच्या दृढ संकल्पाचे कौतुकही हे सभागृह करत आहे.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हल्ला केला. भारताला संपूर्ण जगात लोकशाहीची जननी म्हणून ओळखले जाते. भारतात नेहमीच लोकशाही मुल्यांचे समर्थन केले आहे. अशा भारतात इंदिरा गांधी यांनी हुकुमशाही थोपवली, लोकशाहीची मुल्य चिरडली, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला, अशी जळजळीत टीका बिर्ला यांनी केला.

Lok Sabha Speaker Om Birla
Video Akhilesh Yadav : अखिलेश यादवांचे ओम बिर्लांना चिमटे; म्हणाले, तुमच्या इशाऱ्यावर संसद चालावी, याचे...

दोन मिनिटांचे मौन

बिर्ला यांनी शेवटी आणीबाणीविरोधात दोन मिनिटांचे मौन पाळण्याच्या सूचना दिली. त्यानुसार अध्यक्षांसह सत्ताधारी बाकांवरील सर्व सदस्य उभे राहिले. यावेळी विरोधी बाकांवरील अनेक सदस्य बसून होते. तर काही सदस्य अध्यक्षांविरोधात घोषणा देत होते. शेवटी अध्यक्षांनी गुरूवारपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com