Hardeep Singh Puri  
देश

Hardeep Singh Puri: हरदीपसिंग पुरी यांचा खासदारकीचा तडकाफडकी राजीनामा! नेमकं काय घडलंय?

Hardeep Singh Puri Resigns : केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिला असला तरी त्यांच मंत्रीपद कायम राहणार आहे.

Amit Ujagare

Hardeep Singh Puri Resigns : केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिला असला तरी त्यांचं मंत्रीपद कायम राहणार आहे. कारण यापूर्वीच त्यांची बिनविरोध खासदार म्हणून निवड झाली आहे. पण यानंतर त्यांचं मंत्रीपद बदललं जाणार की तेच राहणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

पार्लमेंट बुलेटिनमधून जाहीर

आज १४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या पार्लमेंट बुलेटिनमध्ये हरदीपसिंग पुरी यांच्या राजीनाम्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हरदीपसिंग पुरी हे राज्यसभेवर निवडले गेलेले सदस्य असून त्यांनी आपल्या उत्तर प्रदेशातील जागेचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा राज्यसभेच्या सभापतींकडून स्विकारण्यात आला आहे. त्यामुळं त्यांची जागा आता रिक्त झाली आहे, असा उल्लेख या पार्लमेंट बुलेटिनमध्ये करण्यात आला आहे.

अचानक दिला राजीनामा

माजी सनदी अधिकारी असलेले हरदीपसिंग पुरी हे सध्या केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत. पुरी हे राज्यसभा खासदार असून उत्तर प्रदेशातील जागेवरुन ८ जानेवारी २०१८ रोजी राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर २६ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांची पुन्हा याच जागेवरुन राज्यसभेवर निवड झाली होती. त्यामुळं त्यांची सहा वर्षांची टर्म येत्या २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. पण तत्पूर्वीच ५ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्य प्रदेशातील जागेवरुन त्यांची पुन्हा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळं त्यांची खासदारकीची ही नवी टर्म सुरु होणार आहे.

मंत्रीपद कायम राहणार

दरम्यान, सध्या हरदीपसिंग पुरी यांच्याकडं मंत्रीपद आणि खात्याचा कारभार असला तरी त्यांच्या सध्याच्या राजीनाम्यामुळं यावर काहीही परिणाम होणार नाही. कारण दोन्ही सभागृहांपैकी कोणत्याही एका सभागृहाचं सहा महिन्यांत सदस्यत्व मिळवणं गरजेचं असतं, अन्यथा अशा मंत्र्याचं मंत्रीपद आपोआप संपुष्टात येतं. त्यामुळं आधीच मध्य प्रदेशातील जागेवर हरदीपसिंग पुरी यांची पुन्हा राज्यसभेवर निवड झाल्यानं या सहा महिन्यांचा कालावधीच्या नियमाची त्यांना अडचण होणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT