Kiran Rijiju, Rahul Gandhi Sakarnama
देश

Kiran Rijiju Vs Rahul Gandhi : ‘बालबुध्दी’ शब्द राहुल गांधींची पाठ सोडेना; ‘मिस इंडिया’ विधानावरून रिजिजू भडकले...

Rajanand More

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविषयी ‘बालकबुध्दी’ हा शब्द वापरला होता. तेव्हापासून भाजप नेत्यांकडून राहुल यांच्याविषयी सातत्याने या शब्दाचा वापर केला जात आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी रविवारी राहुल यांच्यावर हाच शब्द वापरत निशाणा साधला.

प्रयागराज येथे शनिवारी संविधान सन्मान कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी ‘मिस इंडिया’च्या यादीत एकही दलित व आदिवासी नसल्याचे विधान केले होते. यावेळी त्यांनी जातनिहाय जनगणगनेची मागणीही केली होती.

रिजिजू यांनी राहुल यांच्या याच विधानाचा समाचार घेतला. ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये रिजिजू यांनी म्हटले आहे की, आता त्यांना मिस इंडिया स्पर्धा, चित्रपट, खेळांमध्ये आरक्षण हवे आहे. ही केवळ ‘बालबुध्दी’ची समस्या नाही, तर त्यांना प्रोत्साहन देणारे लोकही तितकेच जबाबदार आहेत.

बालबुध्दी मनोरंजनासाठी चांगली असू शकते, पण आपल्या विभाजनकारी चालींसाठी मागास समाजाची थट्टा करू नये, असेही रिजिजू यांनी सुनावले आहे. रिजिजू यांनी राहुल यांच्या विधानाचा व्हिडिओही ‘एक्स’वर पोस्ट केला आहे.

काय म्हटले होते राहुल गांधी?

मी मिस इंडियाची यादी तपासली असल्याचे सांगत राहुल म्हणाले होते की, यामध्ये एकही दलित, आदिवासी किंवा ओबीसी महिला नाही. काहीजण क्रिकेट बॉलीवूडबाबत बोलतात. कुणीही प्लंबरवर बोलत नाही. माध्यमांमधील टॉप निवेदकही 90 टक्क्यांमधील नाहीत.

संस्था, उद्योग, बॉलीवूड, मिस इंडियामध्ये किती 90 टक्क्यांमधील आहेत, हे आम्हाला माहिती करून घ्यायचे आहे. जोपर्यंत 90 टक्के लोकांना भागीदीरी मिळत नाहीत, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही, असेही राहुल गांधी म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT