Mayawati : मायावतींचं ठरलं; काँग्रेस अन् अखिलेश यांच्या पक्षाबाबत घेतला मोठा निर्णय

Congress Samajwadi Party BSP : प्रयागराज येथे शनिवारी झालेल्या संविधान सन्मान कार्यक्रमावरून मायावती यांनी काँग्रेस व सपवर टीका केली आहे.
Mayawati
MayawatiSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी रविवारी काँगेस आणि समाजवादी पक्षाबाबत मोठा निर्णय घेतला. दोन्ही पक्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उपेक्षा केल्याचा आरोप मायावतींनी केला आहे. काँग्रेसने आंबेडकरांना भारतरत्न देऊन सन्मानित केले नाही, असेही मायावतींनी म्हटले आहे.

आगामी काळात दोन्ही पक्षांसोबत कोणत्याही निवडणुकीत आघाडी करणार नसल्याचे मायावती यांनी जाहीर केले आहे. मायावतींनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसने आंबेडकरांच्या चळवळीला गती देणार कांशीराम यांच्या सन्मानार्थ एक दिवसही राष्ट्रीय शोक तर उत्तर प्रदेशात सप सरकारनेही राजकीय शोक घोषित केला नाही. त्यामुळे ह्यांच्या दुटप्पी भूमिकेबाबत सजग राहा.

Mayawati
Modi Government Big Decision: मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट; 'UPS' ला मंजुरी

प्रयागराजमध्ये शनिवारी काँग्रेसने संविधान सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्यावरून मायावतींनी ही टीका केली. त्या म्हणाल्या, केंद्रात भाजपची सत्ता येण्याआधी काँग्रेस सत्तेत असताना राष्ट्रीय जातनिहाय जनगणना का केली नाही? एवढंच नाही तर संविधानानुसार एससी आणि एसटीला मिळालेल्या आरक्षणामध्ये आता वर्गीकरण आणि क्रिमिलेअरच्या माध्यमातून ते निष्प्रभ करण्याच्या षडयंत्राविरोधात काँग्रेस, सप व भाजपने चुप्पी साधली आहे. हेच त्यांचे दलित प्रेम आहे का, असा सवालही मायावतींनी केला आहे.

सप आणि काँग्रेस यांच्यासारख्या आरक्षणविरोधी पक्षांसोबत आता कोणत्याही निवडणुकीत आघाडी करणे एससी, एसटी आणि ओबीसी वर्गांच्या हितासाठी योग्य होईल का, असा सवाल करत मायावतींनी हे कधीच होणार नाही, असे स्पष्ट केले. आता आपल्याला स्वत:च्या हिंमतीवर उभे राहायचे आहे, असा संकल्पही मायावतींनी केला.

Mayawati
Kolkata Rape And Murder Case: कोलकाता प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई; 'आरजी कार'च्‍या माजी प्राचार्यांच्या अडचणी वाढणार

दरम्यान, शनिवारी प्रयागराज येथील संविधान सन्मान कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले होते की, 90 टक्के लोक व्यवस्थेच्या बाहेर आहेत. त्यांच्या भागीदारीशिवाय देश चालू शकत नाही. त्यासाठी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवायला हवी, असे राहुल यांनी म्हटले होते. त्यावरूनही मायावतींनी जोरदार हल्ला चढवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com