Modi Government Big Decision: मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट; 'UPS' ला मंजुरी

Unified Pension Scheme : 1 एप्रिल 2025पासून नवीन पेन्शन योजना लागू होईल, अशी माहिती केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

PM Modi and Unified Pension Scheme : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. नवीन पेन्शन योजनेतील सुधारणांच्या मागणीवर विचार करत, मोदी सरकारने 'यूनिफाइड पेन्शन स्कीम'(UPS)ला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत या योजनेला मंजुरी मिळाली आहे.

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 60 टक्के पेन्शन दिली जाईल. तेच कुणी दहा वर्षांनंतर नोकरी सोडली तर त्याला 10 हजार रुपये पेन्शन दिली जाईल. कॅबिनेट बैठक पार पडल्यानंतर केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव(Ashwini Vaishnav) यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. वैष्णव म्हणाले की, 1 एप्रिल 2025पासून नवीन पेन्शन योजना लागू होईल.

Narendra Modi
Ravneet Singh Bittu : रवनीतसिंग बिट्टू राज्यसभेवर बिनविरोध जाणार; राजस्थानमध्ये पोटनिवडणुकीपूर्वी झाला खेला!

यावेळी केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की, विरोधी पक्ष केवळ ओपीएस वर राजकारण करत आहे. परंतु मोदी(PM Modi) सरकारने कर्मचाऱ्यांचाय मागण्यांवर लक्ष केंद्रित कर, मोठा निर्णय सुनावला आहे. त्यांनी सांगितले की, विरोधक केवळ जुन्या पेन्शन योजनेवरून राजकारण करत आहे.

Narendra Modi
NCP Candidate List News जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी अजित पवारांच्या 'राष्ट्रवादी'ची पहिली उमेदवार यादी जाहीर!

जगभरातील देशांमध्ये काय योजना आहे, त्या बघितल्यानंतर आणि बरीच चर्चा झाल्यानंतर या सोमनाथ कमेटीने यूनिफाइड पेन्शन स्कीमचा सल्ला दिला. कॅबिनेटने यूनिफाइड पेन्शन स्कीमला मंजूरी दिली आहे. कर्मचाऱ्यांकडून खात्रीशीर रकमेची मागणी केली जात होती.

नवीन पेन्शन योजनेतील सुधारणांबाबत डॉ. सोमनाथ कमेटीचे गठण केले गेले होते. या कमेटीने विस्तारपूर्वक चर्चेनंतर अहवाल सादर केला. या योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल असे सांगितले गेले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com