Mallikarjun Kharge, Rajnath Singh Sarkarnama
देश

Rajnath Singh : खर्गेंना 125 वर्षांचे आयुष्य मिळो, कारण..! राजनाथ सिंह यांची देवाकडे प्रार्थना...

Mallikarjun Kharge Narendra Modi : नरेंद्र मोदींना सत्तेतून हटवेपर्यंत आपण जिवंत राहणार असल्याचे विधान मल्लिकार्जून खर्गे यांनी रविवारी केले होते.

Rajanand More

New Delhi : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयीची विधान भाजप नेत्यांना चांगलेच खटकले आहे. सोमवारी सकाळी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी खर्गेंवर टीकेचे बाण सोडले होते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही आता खर्गेंवर निशाणा साधला.

हरियाणातील एका प्रचारसभेत बोलताना राजनाथ सिंह यांनी सोमवारी खर्गे यांच्या पंतप्रधान मोदींवरील विधानाबाबत भाष्य केले. ते म्हणाले, मल्लिकार्जून खर्गे यांना 125 वर्षांचे आयुष्य मिळावे, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. कारण नरेंद्र मोदी 125 वर्षे पंतप्रधान राहणार आहेत.

मी काँग्रेस अध्यक्षांचा आदर करतो. काल एका सभेत खर्गेंना अस्वस्थ वाटू लागले. सुरक्षारक्षकांनी त्यांना आधार दिला. त्यावेळी ते म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींना खुर्चीवरून हटवेपर्यंत जिवंत राहीन. मी त्यांना सांगू इच्छितो, कलियुगात कमाल वय 125 वर्षे आहे. म्हणून त्यांनाही 125 वर्षांचे आयुष्य मिळो, अशी मी प्रार्थना करतो.

काय म्हणाले होते खर्गे?

खर्गेंनी अस्वस्थ वाटू लागल्यानंतर काहीवेळाने आराम केल्यानंतर भाषण केले. यावेळी त्यांना इतरांचा आधार घ्यावा लागला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, मी इतक्या लवकर मरणार नाही. मोदींना सत्तेवरून हटवेपर्यंत मी जिवंत असेन, असे खर्गे यांनी म्हटले होते.

अमित शाहांकडूनही समाचार

अमित शाह यांनी सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून खर्गेंवर टीका केली. काँग्रेसच्या मनात पंतप्रधान मोदी यांच्याविषयी किती द्वेष आणि भीती आहे, हेच या विधानावरून दिसत आहे. काँग्रेस नेते सातत्याने त्यांच्याविषयीच विचार करत असतात, असे ते म्हणाले. खर्गे यांच्या आरोग्याविषयी पंतप्रधानांसह मी आणि आम्ही सर्वचजण प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांचे आरोग्य चांगले राहावे, असेही शाह यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT