Siddaramaiah : सिध्दरामय्यांनी CBI ला हद्दपार करताच ED सक्रीय; कर्नाटकात मोठ्या घडामोडीचे संकेत

MUDA Scam case ED Action : कथित MUDA घोटाळाप्रकरणी सिध्दरामय्या यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
Siddaramaiah
SiddaramaiahSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत राज्यात मोठ्या घडामोडी घडू शकतात. सिध्दरामय्या यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यात सीबीआयला कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारच्या परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. त्यानंतर लगेच ईडी सक्रीय झाली आहे.

म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण (MUDA) जमीन घोटाळाप्रकरणी ईडीकडून मुख्यमंत्र्यांवर कारवाई केली जाऊ शकते. याबाबतचे वृत्त ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. ईडीकडून पीएमएलए कायद्यानुसार मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे वृत्तात म्हटले आहे. त्यासाठी ईडीकडून लोकायुक्त पोलिसांच्या एफआयआरचा अभ्यास केला जात आहे.

Siddaramaiah
Rahul Gandhi : राहुल गांधींनी हरियाणात एका झटक्यात निवडणुकीचं वारं फिरवलं; 'या' कृतीतून काँग्रेसला सुखद धक्का

ईडीने काही महिन्यांपूर्वीच हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. आता सिध्दरामय्या यांच्यावरही गुन्हा दाखल केल्यास ईडी त्यांनाही जेलवारी घडवणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. मागील आठवड्यातच विशेष कोर्टाच्या आदेशानुसार लोकायुक्त पोलिसांनी सिध्दरामय्या यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ईडी कारवाईची चर्चा सुरू झाल्यानंतर कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपच्या स्क्रिप्टनुसार ईडीची कारवाई होऊ शकते. भाजपच्या स्क्रिप्टनुसारच हे सुरू आहे. विरोधकांना घाबरवण्यासाठी ते सीबीआय, ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांना पाठवतात, असे खर्गे म्हणाले.

Siddaramaiah
Tirupati Laddu Case : तिरुपती लाडू प्रकरण चंद्राबाबूंच्याच अंगलट; सुप्रीम कोर्टाने फटकारले...

सिध्दरामय्या आणि काँग्रेस पक्ष चौकशीला घाबरत नाही, असे सांगताना खर्गे म्हणाले, हायकोर्टाने आधीच या प्रकरणातील दोन कलमे हटवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारनेही विशेष तपास पथक चौकशीसाठी नेमले आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत.

काय आहे प्रकरण?

MUDA ने सिध्दरामय्या यांच्या पत्नीला 14 भूखंड बेकायदेशीरपणे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार गेल्यानंतर राज्यपालांकडे सिध्दरामय्या यांच्यावर खटला दाखल करण्याची परवानगी मागण्यात आली होती. त्याला मंजूरी मिळाल्यानंतर सिध्दरामय्यांनी त्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली. पण हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे. त्यानंतर विशेष कोर्टानेही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com