<div class="paragraphs"><p>Smriti Irani</p></div>

Smriti Irani

 

Sarkarnama

देश

काँग्रेस नेत्यावर स्मृती इराणी भडकल्या अन् म्हणाल्या, त्यांना आधी निलंबित करा!

सरकारनामा ब्युरो

दिल्ली : कर्नाटक विधानसभेचे (Karnataka Assembly) अध्यक्ष विश्वेश्वर कागेरी हेगडे आणि काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ आमदार के. आर. रमेश कुमार (K R Ramesh Kumar) यांच्यातील संवाद आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विधानसभेमध्ये कुमार यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा गदारोळ उडाला. या वक्तव्यावरून दिल्लीत काँग्रेस विरुद्ध भाजप (BJP) असा सामना रंगला आहे. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) या मुद्द्यावर चांगल्याच संतापल्या आहेत.

कुमार यांच्या विधानाचे पडसाद दिल्लीतही उमटले आहेत. स्मृती इराणी यांनी आज लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला. विधानसभेत काँग्रेस नेत्याने केलेले विधान अतिशय लज्जास्पद आहे. काँग्रेसने प्रथम आपल्या नेत्याला निलंबित करावे आणि नंतर 'लडकी हूँ, लड सकती हूँ', अशी घोषणा उत्तर प्रदेशात जाऊन द्यावी, असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी कुमार यांच्या माफीनाम्याची माहिती दिली. कुमार यांनी माफी मागितल्याने या प्रकरणावर पडदा पडावा, असे ते म्हणाले.

काँग्रेसवर या प्रकरणी टीका होऊ लागल्याने पक्षाने कुमार यांच्या वक्तव्यावर जाहीरपणे भूमिका घेत यापासून पक्षाला वेगळे केले आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारामध्ये सभागृहात झालेल्या संवाद हा आक्षेपार्ह आणि असंवेनदशील होता. काँग्रेसला हे कदापी स्वीकारार्ह नाही. अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते हे समाजाचे आदर्श असतात. त्यांच्याकडून असे वर्तन घडणे चुकीचे आहे.

बलात्कारापासून (Rape) वाचू शकत नसाल, तर झोपा आणि त्याचा आनंद घ्या, असं विधान रमेश कुमार यांनी केलं होते. विशेष म्हणजे त्यावर विधानसभेचे अध्यक्ष व सत्ताधारी भाजपचे (BJP) आमदारही काही बोलले नाहीत. उलट रमेश कुमार यांच्या विधानावर विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी हेसुद्धा हसत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असल्याने आणखी संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर मोठा गदारोळ झाल्याने कुमार यांनी माफी मागून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT