bjp flag sarkarnama
देश

BJP leader News : निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का; बड्या नेत्याचा विरोधी पक्षात प्रवेश, राजकीय समीकरणे बदलणार

Former BJP Minister News : विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत. भाजप व बहुजन समाज पक्षाचे नेते प्रवेश करीत आहेत.

सरकारनामा ब्युरो

New Dehli News : उत्तरप्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षाने सुरु केली आहे . त्यामुळे एकीकडे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्ष प्रवेश होत आहेत. याठिकाणी भाजप व समाजवादी पक्षात मोठी चुरस पाहवयास मिळत आहे. त्यामुळेच दोन्ही पक्षांनी आतापासूनच दिग्गज नेते गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे नेते व माजी राज्यमंत्री उत्पल राय यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर गाझीपूर, मऊमधील सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

उत्तरप्रदेशमध्ये बसपा सरकारच्या काळात उत्पल राय हे राज्यमंत्री होते. त्यांच्या समाजवादी पक्ष (Samajvadi Party) प्रवेशामुळे गाझीपूर आणि मऊमधील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रवेशामुळे येत्या काळात समाजवादी पक्षाला बळ मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांचे उत्पल राय हे निकटवर्तीय आहेत. त्यांनी जुलै 2016 मध्ये भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. तसेच ते अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्षही राहिले आहेत. उत्पल राय हे मऊ जिल्ह्यातील रहिवासी असून, मधुबन विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आहे. डॉ. शकुंतला मिश्रा पुनर्वसन विद्यापीठाचे माजी कुलगुरू निशीथ राय यांचे ते धाकटे बंधू आहेत.

उत्पल राय यांनी 2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली होती. आता त्यांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केल्याने उत्तर प्रदेशातील गाझीपूर आणि मऊच्या राजकारणात या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत. भाजप व बहुजन समाज पक्षाचे नेते प्रवेश करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. भाजप नेते उत्पल राय यांचे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी स्वागत केले. उत्पल राय यांनी कमळ सोडून समाजवादी पक्षाची साथ दिल्याचा टोला अखिलेश यादव यांनी लगावला. त्याससोबतच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारच्या कारभारावर त्यांनी टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT