MLC Election 2026: प्रसिद्ध ज्योतिषाचार्य आचार्य इंदु प्रकाश मिश्रा ज्यांनी आजवर अनेक राजकारण्यांचं भविष्य वर्तवलं आहे, ते आपल्या पत्नीचा उत्तर प्रदेशच्या विधानपरिषद निवडणुकीचं भाकीत सांगू शकले नाहीत. लखनऊ पदवीधर मतदारसंघातून त्यांच्या पत्नी स्मिता मिश्रा यांचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळं मिश्रांची सध्या चर्चा सुरु आहे.
उत्तर प्रदेशच्या विधान परिषद निवडणुकीतील लखनऊ पदवीधर जागेवर समाजवादी पार्टीचे कांती सिंह यांनी भाजपला मोठा झटका दिला आहे. कांती सिंह यांनी विधान परिषदेत आपली जागा वाचवण्यासाठी उतरलेल्या भाजपाचे अवनीश सिंह पटेल यांचा पराभव केला. याच जागेवर प्रसिद्ध ज्योतिषाचार्य इंदु प्रकाश मिश्रा यांच्या पत्नी स्मिता मिश्रा या देखील नशिब आजमावत होत्या. स्मिता मिश्रा यांना या निवडणुकीत केवळ ३०० मतंच मिळाली. या जागी त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होत्या.
स्मिता मिश्रा यांनी आपल्या पराभवानंतर निवडणुकीत गोंधळ झाल्याचा आणि बुथ कॅप्चरिंगचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं की, आपल्यासमोरच आपल्या एजंटवर ओरडून त्याला मतदान केंद्रावरुन बाहेर काढण्यात आलं. मी निवडणुकीसाठी बरीच तयारी केली होती. कॉलेजांमध्ये जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांशी संपर्क केला होता. निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यानं माझ्या सर्व मेहनतीवर पाणी फेरलं गेलं आहे.
स्मिता मिश्रा यांनी आपल्याला तिकीट मिळेल या आशेष काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. २८ सप्टेंबर रोजी स्मिता मिश्रा काँग्रेसमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी त्यांना लखनऊ विभागातून पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं होतं. काही दिवसांनंतरच अजय राय प्रदेशाध्यक्षपदावरुन दूर झाले. पण नव्या अध्यक्षा बनलेल्या आराधना मिश्रा यांनी स्मिता मिश्रा यांचं तिकीट कापलं. त्यामुळं मोठा झटका बसल्यानंतर स्मिता मिश्रा यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर स्मिता मिश्रा यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
पत्नीचा दारुण पराभव झाल्यानंतर ज्योतिषी इंदु प्रकार मिश्रा हे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत. लोकांनी म्हटलं की, दुसऱ्यांचं भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना आपल्यापत्नीचं निवडणुकीतलं भविष्य काय आहे? हे कळलं नाही. काही जण म्हणाले की, पत्नीचा पराभव होऊ नये म्हणून त्यांनी काही उपाय का केला नाही. तसंच निवडणूक निकालांबाबत त्यांनी भाकीत का केलं नाही?
इंदु प्रकाश मिश्रा हे अनेकदा टीव्ही कार्यक्रमांमध्ये देखील दिसत असतात. जर त्यांची वेबसाईट इंदु प्रकाश डॉट कॉमवर तुम्ही गेलात तर माहिती पडेल की, त्यांनी अनेकांचं अचूक भविष्य सांगितल्याचा दावा केला आहे. यामध्ये भारतानं क्रिकेटमध्ये सात धावांनी वर्ल्डकप जिंकणं असेल, सोव्हियत संघाच्या फुटीचं भाकीत, अमेरिकच्या ट्वीन टॉवरवर हल्ल्याचं भाकीत, नेल्सन मंडेला यांच्या सुटकेचं भाकीत, तसंच ८ नोव्हेंबर २०२५ मध्ये आलेल्या शक्तीशाली भूकंपाचं भाकीत त्यांनी १३ दिवस आधीच केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.