R K Sinha death : भाजपचे संस्थापक सदस्य आर. के. सिन्हा यांचे निधन; वाजपेयी, अडवाणींचे होते निकटवर्ती सहकारी

R K Sinha, Ravindra Kishore Sinha : मुळचे बिहारचे असलेल्या आर. के. सिन्हा यांनी उद्योजक म्हणूनही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
R K Sinha death
R K Sinha deathSarkarnama
Published on: 
Updated on: 

BJP founder member news : भारतीय जनता पक्षाचे संस्थापक सदस्य रविंद्र किशोर सिन्हा यांचे नोएडा येथे निधन झाले. मागील काही दिवसांपासून ब्रेन स्ट्रोकमुळे ते कोमामध्ये होते. अखेर शुक्रवारी वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांचे ते निकटवर्ती सहकारी होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रीय झालेले आर. के. सिन्हा हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक होते. भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले सिन्हा राज्यसभेचे खासदारही होते. त्यांच्या संसदीय राजकारणाची सुरूवात २०१४ मध्ये झाली होती. ते २०२० पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते.

मुळचे बिहारचे असलेल्या सिन्हा यांनी उद्योजक म्हणूनही आपले स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. ते एशिया-पॅसिफिकमधील प्रमुख सुरक्षा आणि सेवा पुरवठादार कंपनी असलेल्या एसआयएस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

R K Sinha death
IAS अधिकाऱ्याची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात; भाजपकडून पंचायत समितीसाठी उमेदवारी

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे की, 'सिन्हा यांनी संघटन मजबूत करण्यात महत्वाची भूमिका बजावली. राज्यसभा खासदार म्हणून त्यांनी सदैव जनहिताची कामे केली. संघटनेचा विस्तार आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान अविस्मरणीय राहील.

R K Sinha death
Gokul latest news : सतेज पाटील पुन्हा कंडका पाडणार; मुश्रीफांसह सर्व विरोधकांचा डाव उधळून लावण्यासाठी उचललं मोठं पाऊल...

सिन्हा यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी असल्याची भावना केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी व्यक्त केली. भाजप परिवारासाठी त्यांचे निधन म्हणजे कधीही भरून न येणारे नुकसान असल्याचेही ते म्हणाले आहेत. भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी म्हटले आहे की, पत्रकारिता, समाजसेवा, उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील सिन्हा यांचे योगदान नेहमीच लक्षात राहील. संघटनेसाठी त्यांचे समर्पण, माजी सैनिकांचे पुनर्वसन आणि रोजगारासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आठवणीत राहतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.