BJP Sarkarnama
देश

BJP politics : विरोधक एकवटलेले असतानाच भाजपने दिला दणका; इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षाचे तीन आमदार फोडले...

Samajwadi Party MLAs join BJP, Abhay Singh, Rakesh Pratap Singh, Vinod Chaturvedi : भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी विनोद चतुर्वेदी यांनी सपामधील आणखी नेते, आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

Rajanand More

BJP Uttar Pradesh news : केंद्रीय निवडणूक आयोग आणि सरकारविरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. इंडिया आघाडीच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून सातत्याने आंदोलने सुरू आहेत. त्यामध्ये आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचाही समावेश आहे. भाजपने याच पक्षाला जोरदार दणका दिला आहे.

समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेशातील तीन आमदारांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. अमेठीमध्ये पक्षाच्या नेत्या स्मृती इराणी आणि प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. आमदार अभय सिंह, राकेश प्रताप सिंह आणि विनोद चतुर्वेदी यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे.

राज्यात काही महिन्यावंर विधानसभेची निवडणूक आलेली असतानाच तीन आमदार भाजपच्या हाती लागले आहेत. त्यामुळे अखिलेश यादव यांना मोठा झटका बसला आहे. सपाने जून २०२५ मध्ये तीन आमदारांवर पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई केली होती. तेव्हापासूनच हे आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती.

आणखी नेते फुटणार

भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी विनोद चतुर्वेदी यांनी सपामधील आणखी नेते, आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री जयवीर सिंह यांनीही मोठ्या राजकीय परिवर्तनाची ही सुरूवात असल्याचे म्हटले आहे. या घडामोडींमुळे अखिलेश यांचे टेन्शन वाढले आहे.

दरम्यान, राकेश प्रताप सिंह हे गौरीगंज मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आले आहेत. त्यांनी २०२२ च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यांनी २०२४ च्या राज्यसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान केल्या आरोप होता. आमदार अभय सिंह हे २०१२ आणि २०२२ मध्ये निवडून आले आहेत. तर विनोद चतुर्वेदी हे २००७ आणि २०२२ मध्ये कल्पी मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT