Gautam Adani Sarkarnama
देश

Gautam Adani Case : अमेरिकेतील अदानी प्रकरणात मोठी घडामोड; ‘अ‍ॅटर्नी’ देणार राजीनामा; काय घडलं पडद्यामागे?

Adani Controversy in the US Updates : अमेरिकेतील अ‍ॅटर्नी ब्रायन पीस हे येत्या 10 जानेवारीला राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

Rajanand More

New Delhi : मागील काही दिवसांपासून देशभरात काँग्रेसकडून सातत्याने आवाज उठवल्या जात असलेल्या कथित अदानी लाच प्रकरणाबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील कोर्टात अदानी समुहातील कंपनी आणि अधिकाऱ्यांवर लाचखोरीचे कथित आरोप करणारे अ‍ॅटर्नी म्हणजेच सरकारचे कायदेशीर अधिकारी राजीनामा देणार आहेत. याबाबत त्यांनी नुकतीच घोषणा केली आहे.

अदानी ग्रुपमधीलल कंपनी अदानी ग्रीन एनर्जी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अमेरिकेत लाचखोरीचे आरोप करण्यात आले आहेत. त्याबाबतचा खटला दाखल करण्यात आला असून त्यावरून भारतात विरोधकांनी सत्ताधारी भाजपला घेरले आहे. काँग्रेसकडून सातत्याने अदानींना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संरक्षण असल्याचा आरोप केला जात आहे. संसदेत या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणीही काँग्रेसकडून केली जात होती.

अदानी समूहाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यातच ब्रायन पीस यांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर आले आहे. यामागचे कारणही स्पष्ट झाले आहे. पीस यांनी अ‍ॅटर्नी या पदावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नियुक्ती केली होती. आता बायडेन यांची जागा डोनाल्ड ट्रम्प घेणार आहेत. त्यामुळे त्याआधीच पीस यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

पीस हे 10 जानेवारीला आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे. पीस हे ब्रुकलिनचे राहणारे असून 53 वर्षांचे आहत. त्यांनी बुधवारी राजीनाम्याबाबत प्रसिध्दीपत्रक काढत राजीनाम्याची घोषणा केली. 2021 मध्ये त्यांची अ‍ॅटर्नी या पदावर नियुक्त झाली आहे. ट्रम्प हे 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या शपथविधीनंतर पीस यांची जागा कैरोलिन पोकॉर्नी घेणार आहेत.

का दाखल झालाय खटला? 

गौतम अदानी यांच्या कंपनीवर अमेरिकेमध्ये फसवणुकीचा तसेच लाच दिल्याचा खटला दाखल करण्यात आला आहे. अमरिकेतील त्यांच्या एका कंपनीला काँट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी 2236 कोटी रुपयांची लाच देण्याचा तसेच हे प्रकरण लपवण्यासाठी प्रयत्न करण्याचा आरोप आहे. या कॉन्ट्रॅक्टमधून पुढील वीस वर्षांत दोन अब्ज डॉलरचा फायदा मिळू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यासाठी खोटे दावे करून कर्ज आणि बॉन्ड्सची जुळवाजुळव करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT