Om Birla : धक्काबुक्की प्रकरणानंतर ओम बिर्ला यांचा मोठा निर्णय!

Lok Sabha Speaker decision on Parliament scuffle : संसदेच्या मकर गेटजवळ झालेल्या धक्काबुक्की प्रकरणानंतर लोकसभा अध्यक्षांनी मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संसदेचे कामकाज सुरळित पार पाडण्याच्या हेतूने घेण्यात आला आहे.
Om Birla
Om Birla Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: संसदेच्या परिसरातील मकर गेटजवळ झालेल्या हाणामारीनंतर लोकसभा अध्यक्षांनी मोठा निर्णय घेतला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर कोणत्याही खासदार किंवा राजकीय पक्षाला आंदोलन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

गुरुवारी भाजप आणि काँग्रेस सदस्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्की प्रकरणानंतर लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी हा निर्णय घेतला आहे. संसदेच्या सूत्रांनी सांगितले की, अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी सक्त निर्देश जारी केले आहेत की कोणत्याही खासदार, सदस्यांच्या गटाला किंवा राजकीय पक्षाला संसद भवनाच्या गेटवर कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा निदर्शने करण्याची परवानगी दिली जाणार नाही. संसदेचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.

हा निर्णय का घेतला गेला?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गुरुवारी मोर्चा काढला, तर भाजप खासदारांनी काँग्रेसवर बाबासाहेबांचा अवमान केल्याचा आरोप करत निषेध केला. संसद भवनाच्या मकर गेटजवळ सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी एकमेकांसमोर येऊन घोषणाबाजी केली.

Om Birla
FIR against Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधात FIR दाखल; संसद आवारात धुक्काबुक्की प्रकरण!

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर भाजपच्या दोन खासदारांनी धक्काबुक्कीचा आरोप केला आहे. यामध्ये खासदार प्रताप सारंगी जखमी झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. भाजप खासदार मुकेश राजपूतही जखमी झाले आहेत. त्यामुळेच राहुल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

तसेच भाजपच्याच एका महिला खासदाराने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना राहुल गांधी माझ्या अत्यंत जवळ येऊन उभे राहिले. त्यामुळे मी अनकम्फर्टेबल झाले होते. राहुल गांधी माझ्यावर ओरडलेही. अशी तक्रार नागालँडच्या भाजपच्या खासदार फांगनोन यांनी राहुल गांधीची तक्रार राज्यसभेचे उपसभापती जगदीप धनखड यांच्याकडे केली आहे. या घटनेमुळे ओम बिर्ला यांनी या निर्णय घेतला आहे.

Om Birla
Rahul Gandhi : नव्या फौजदारी कायद्यातील ‘या’ 6 गंभीर कलमांच्या कचाट्यात राहुल गांधी अडकणार?

राहुल गांधी यांच्याविरोधात FIR

भाजप नेते आणि काँग्रेस यांच्यात हाणामारी झाल्यानंतर अनुराग ठाकूर, बन्सुरी स्वराज आणि हेमांग जोशी यांच्यासह भाजप नेत्यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन राहुल गांधी विरोधात तक्रार दाखल केली. त्यामध्ये कलम 115 (जाणूनबुजून दुखापत करणे), कलम 117 (जाणूनबुजून गंभीर दुखापत करणे), कलम 121 (सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या कर्तव्यापासून विचलित करण्यासाठी दुखापत करणे), कलम 351 (धमकावणे) आणि कलम 125 (दुसऱ्यांची सुरक्षा धोक्यात टाकणे) या कलमांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com