US Denied Arun Yogiraj VISA Sarkarnama
देश

Arun Yogiraj News : अयोध्येतील रामलल्लाची मूर्ती साकारणाऱ्या अरूण योगीराज यांना अमेरिकेने नाकारला 'VISA'

US Denied Arun Yogiraj VISA : जाणून घ्या, योगीराज यांच्या परिवाराने काय दिली प्रतिक्रिया आणि नेमकं कशासाठी ते जाणार होते,अमेरिकेला?

Mayur Ratnaparkhe

Arun Yogiraj VISA News : श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील ऐतिहासिक राम मंदिरात अत्यंत सुरेख अशी रामलल्लाची मूर्ती साकारणारे मूर्तीकार अरूण योगीराज यांना अमेरिकेने 'VISA' देण्यास नकार दिला आहे. त्यांना 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत वर्जीनिया येथे ग्रेटर रिचमंड कन्वेंशन सेंटर येथे आयोजित होणाऱ्या बाराव्या AKKA विश्व कन्नड संमेलनात सहभागी होण्यास जाणार होते.

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेने व्हिसा नाकारल्याने अरूण योगीराज यांच्या परिवाराने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, अरूण योगीराजची पत्नी विजेता या आधीच अमेरिकेला पोहचलेल्या आहेत आणि आता योगीराज(Arun Yogiraj) यांना व्हिसा नाकारला गेल्याने वाईट वाटत आहे. त्यांनी हेही सांगितले की, योगीराज यांनी अमेरिकेला जाण्याची संपूर्ण तयारी केली होती. परंतु ऐनवेळी व्हिसा नाकारला गेला.

याशिवाय योगीराज यांच्या परिवारातील सदस्यांनी हेही सांगितले की, योगीराज हे अमेरिकेत केवळ संमेलनात सहभागी होण्यासाठी जाणार होते आणि त्यानंतर ते तत्काळ परतही येणार होते. योगीराज यांचा हा दौरा एकूण 20 दिवसांचा होता. योगीराज यांचा व्हिसा का नाकारला गेला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तसेच त्यांनी हेही सांगितले की योगीराज यांनी व्हिसा साठी अर्ज केला होता. अर्जात संपूर्ण माहिती व्यवस्थित दिली होती आणि सर्व कागदपत्रंही जोडली होती. मात्र तरीही त्यांचा अर्ज फेटाळला गेला, त्याचे कारण समजू शकले नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT