Maharashtra Vidhansabha Election and BJP : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे त्या आता लवकरच महाराष्ट्रातील उमेदवारांच्या प्रचारात सक्रीयपणे दिसणार आहेत.
सुलक्षणा सावंत यांची महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चा सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नुयुक्तीनंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
महिला मोर्चाच्या सहप्रभारीपदी नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी भाजप(BJP) नेतृत्वाचे आभार मानले. इतर चार महिलांच्या सोबत आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकत्र काम करुन, राज्यात भाजप नेतृत्वातील महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार, असे सुलक्षणा सावंत म्हणाल्या.
गोवा महिला मोर्चा राज्यप्रभारी असणाऱ्या सुलक्षणा सावंत यांच्याकडे महाराष्ट्रात देखील सहप्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर महाराष्ट्रात भाजप नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करणार. महाराष्ट्रात काम करताना यापूर्वीच्या अनुभवाचा फायदा होईल, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी व्यक्त केले.
यापूर्वी महाराष्ट्र , गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये काम करण्याचा अनुभव घेतला आहे. या राज्यांमधील कामाचा अनुभव महाराष्ट्रात कामाला येईल, असे मत सुलक्षणा सावंत यांनी व्यक्त केले.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ठेवलेला विश्वास सार्थ ठरविताना महाराष्ट्र राज्यात भाजपचे युतीबरोबर सरकार आणण्यासाठी काम करणार. आपल्याबरोबर नियुक्त करण्यात आलेल्या चारही महिला मिळून महाराष्ट्रात भाजपला सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.