Amy Tripp on US Election Sarkarnama
देश

US Election 2024 : ट्रम्प की कमला हॅरिस, कोण जिंकणार? महिला ज्योतिषी एमी ट्रीप यांची भविष्यवाणी ठरते खरी...

Rajanand More

New Delhi : अमेरिकीतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता खऱ्या अर्थाने रंगत आली आहे. ज्यो बायडेन यांच्या माघारीनंतर कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात थेट लढत होणार आहे. दोघांमध्ये कोण बाजी मारणार, याची उत्सुकता वाढलेली असताना चर्चेत असलेल्या महिला ज्योतिषी एमी ट्रीप यांनी मोठा दावा केला आहे.

एमी ट्रीप यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याबाबत भविष्यवाणी वर्तवली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ग्रह डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने असल्याने ते विजयी होऊ शकतात. त्यांच्या राशीतील सूर्य त्यांना विजयापर्यंत नेणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबतही त्यांनी मोठं भाकीत वर्तवले आहे. ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न ही केवळ सुरूवात आहे. पुढील दिवसांत त्यांच्यावर आणखी मोठी संकटे येऊ शकतात, असा दावा ट्रीप यांनी केला आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या समर्थकांची भीती वाढली आहे.

40 वर्षीय ट्रीप यांनी बायडेन यांच्याविषयी 11 जुलैला भविष्यवाणी केली होती. त्यांनी 29 जुलै रोजी बायडेन निवडणुकीतून माघार घेतील असे त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले होते. कमला हॅरिस राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे भाकीत त्यांनी चार वर्षांपूर्वी वर्तवले होते. ही दोन्ही भाकीते खरी ठरली आहेत.

ऑगस्ट महिन्यात देशात राजकीय अशांतता असेल, असे ट्रीप यांनी म्हटले आहे. त्या स्टारहिल नावाने एक्सवर सक्रीय आहेत. त्यांच्या भविष्यवाणीमुळे कमला हॅरिस यांचे टेन्शन वाढणार आहे. नोव्हेंबर महिन्यात ही निवडणूक होणार असून पुढील महिन्यापासून खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचारात सुरुवात होणार आहे. बायडेन यांच्या वयामुळे त्यांना या निवडणुकीत माघार घेण्यास सांगण्यात आले. डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन पक्षामध्ये थेट लढत होणार आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT