New Delhi : अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीसाठी जेमतेम पाच दिवस उरले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार कमला हॅरिस यांच्यात कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यातच एका सर्व्हेने दोघांचेही टेन्शन वाढवले आहे.
निवडणुकीआधी रॉयटर्स या न्यूज एजन्सीने केलेल्या सर्व्हेनुसार, सध्या कमला हॅरिस यांचे पारडे किंचित जड असल्याचे समोर आले आहे. सर्व्हेनुसार हॅरिस यांना 44 टक्के मतदार मतदान करू शकतात. मात्र, ट्रम्प यांची पिछाडीही फारशी नाही. ते केवळ एक टक्क्यांनी मागे आहेत. त्यांच्या समर्थनार्थ 43 टक्के लोक मतदान करू शकतात.
या सर्व्हेने दोन्ही नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. आता प्रचारासाठी काही तास उरले आहेत. त्यामध्ये कोण आघाडी घेणार, कुणाला मतदारांचे समर्थन अधिक मिळणार, यावरच दोघांचेही भवितव्य अवलंबून राहणार आहे. हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत. त्या निवडून आल्यास भारतीय वंशाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत. त्यामुळे भारतामध्येही या निवडणुकीची उत्सुकता आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सीबीसी न्यूजने केलेल्या निवडणूक सर्व्हेमध्येही कमला हॅरिस ट्रम्प यांच्यापेक्षा केवळ एक टक्क्यांनी आघाडीवर होत्या. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये निवडणुकीत मोठी चुरस असल्याचे स्पष्टपणे दिसते. तर एबीसी न्यूजच्या सर्व्हेमध्ये हॅरिस आणि ट्रम्प यांच्या मतांमध्ये चार टक्क्यांचे अंतर होते.
निवडणूक प्रचारामध्ये सध्या बेरोजगारी, अर्थव्यवस्थेतील सुधारणा आदी मुद्दे प्रकर्षाने मांडले जात आहेत. दोन्ही नेत्यांकडून रोजगार वाढवण्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र, अमेरिकेत काही राज्यांमधील मतदारांना सर्वाधिक आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या राज्यांतील मतदार कुणाच्या बाजूने उभे राहणार, याबाबत अनिश्चितता असते. या मतदारांच्या सर्वाधिक समर्थन ज्या उमेदवाराला मिळते, तो विजयी होतो, असे येथील गणित आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांकडून सध्या या राज्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.