
New Delhi News : वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका गांधी यांची पहिली प्रचारसभा सोमवारी झाली. त्यामुळे या सभेत त्या काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. त्यांनी मदर तेरेसा यांच्या पहिल्या भेटीतील एक आठवण सांगत मतदारांना भावनिक साद घातली.
काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेली मतदारसंघ निवडल्यानंतर प्रियांका वायनाडूमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. मागील आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी सोमवारपासून आपल्या प्रचार मोहिमेला सुरूवात केली. आधी रोड शो आणि नंतर त्यांची सभा झाली.
प्रियांका गांधी यांनी पहिल्यांदाच मदर तेरेसा यांची एक आठवण जाहीर सभेत सांगितली आहे. त्या म्हणाल्या, वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी मदर तेरेसा आईला भेटण्यासाठी घरी आल्या होत्या. त्यावेळी मी 19 वर्षांची होती. मला ताप होता. माझ्या जवळ येत त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि माझ्या हातात फुले दिली.
आपल्यासोबत काम करायला सुरूवात कर, असा सल्ला मदर तेरेसांनी दिल्याचे सांगत प्रियांका गांधी म्हणाल्या, त्यानंतर मी पाच वर्षांनी दिल्लीमध्ये त्यांच्या सिस्टर्ससोबत काम करायला सुरूवात केली. तिथे लहान मुलांना शिकवण्याचे काम करत होते. त्यावेळी मी बाथरुम्सची स्वच्छता केली, भांडी घासली, जेवण बनवले. त्या काळात अनाथांचे दु:ख समजली. या घटकांची समाजानेही मदत करायला हवी, अशी प्रियांका यांनी यावेळी व्यक्त केली.
मदर तेरेसा यांना भेटले तेव्हा त्यांनी मला मिठी मारली होती. जणू मी त्यांचीच मुलगी आहे, अशी त्यांची त्यावेळची भावना होती. तुमच्यात आणि माझ्या आईमध्ये काहीच फरक वाटत नाही, असे मी त्यांनाही सांगितले. त्याचप्रमाणे आज वायनाडची जनताही मला माझ्या आईप्रमाणे वाटत असल्याचे प्रियांका गांधी म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.