Lawrence Bishnoi Gang : झिशान सिद्दिकींना भेटलेले खासदार बिश्नोई गँगच्या टार्गेटवर; काय आहे कारण?

MP Pappu Yadav: खासदार पप्पू यादव यांनी नुकतीच मुंबईत येऊन आमदार झिशान सिद्दीकी यांची भेट घेतली होती.
Lawrence Bishnoi, Pappu Yadav
Lawrence Bishnoi, Pappu YadavSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिहारमधील अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी लॉरेन्स बिश्नोई गँगला थेट आव्हान दिले होते. तीन दिवसांपूर्वी यादव यांनी मुंबईत आमदार झिशान सिद्दीकी यांचीही भेट घेतली. त्यानंतर आता यादव हे बिश्नोई गँगच्या टार्गेटवर आले आहेत.

बाबा सिद्दीकी यांची हत्या बिश्नोई गँगने केल्याचे स्पष्ट झाले आहे. सिद्दीकी कुटुंबीय मुळचे बिहारचे असल्याने खासदार पप्पू यादव घटनेनंतर चांगलेच भडकले होते. त्यांनी बिश्नोईचा खात्मा करण्याची भाषा केली होती. त्यानंतर झिशान आणि अभिनेता सलमान खान यांना भेटण्यासाठी तीन दिवसांपूर्वी मुंबईत आले होते.

Lawrence Bishnoi, Pappu Yadav
Jharkhand Election: काँग्रेसला मोठा धक्का; माजी कार्यकारी अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबईत यादव यांनी झिशान यांची भेट घेतली. मात्र सलमान खानसोबत बेट झाली नाही. त्याच्याशी फोनवर बोलणे झाल्याचा दावा यादव यांनी केला आहे. या भेटीनंतर यादव यांना बिश्नोई गँगकडून धमकी आली आहे. काही वृत्तपत्रांमधून माहिती मिळाली की मागील काही दिवसांपासून बिश्नोईभाई विरोधात उलटसुलट बयान करत आहे. औकादीत रहा. राजकारणावर लक्ष द्या. टीआरपी कमवण्याच्या नादात पडू नका नाहीतर रेस्ट इन पीस करू, अशी धमकी यादव यांना मिळाली आहे.

पप्पू यादव यांना आलेल्या धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या धमकीनंतर यादव यांनी बिहार पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. त्यांनी झेड दर्जाच्या सुरक्षेची मागणी केली आहे. सुरक्षा मिळाली नाही तर माझी कधीही हत्या होऊ शकते. त्याला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असेल, यादव यांनी म्हटले आहे.

Lawrence Bishnoi, Pappu Yadav
Thalapathy Vijay : थलपती विजयच्या पहिल्या सभेला प्रचंड प्रतिसाद; 'DMK'वर केला गंभीर आरोप!

काय म्हणाले होते पप्पू यादव?

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर पप्पू यादव यांनी बिश्नोईवर वादग्रस्त विधान केले होते. यादव म्हणाले होते की, ‘कायद्याने परवानगी दिली तर 24 तासांत बिश्नोईसारख्या गुन्हेगारांचे पूर्ण नेटवर्क संपवून टाकेन.’ त्यानंतर आता बिश्नोई गँगने त्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com