US attack on Tehran : अमेरिका-इस्राइल विरूद्ध इराणमध्ये सुरू असलेलं युद्ध दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहे. दोन्ही बाजूंनी माघार घेतली जात नसल्याने सध्या तरी युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत.
अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला केल्याचा दावा केला आहे.
शिवाय या हल्ल्यात इराणचे अनेक वरिष्ठ लष्करी नेते ठार झाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला आहे. या व्हिडिओत रात्रीच्या वेळी अनेक क्षेपणास्त्र एकाच वेळी डागल्याचं दिसत आहे. या हल्ल्यामुळे मोठा स्फोट झाल्याचं दिसत आहे.
तर अमेरिकेच्या या हल्ल्याला आता इराण प्रत्युत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि इराणने प्रत्युत्तर दिल्यास हे युद्ध आणखी चिघण्याची शक्यता आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या 48 तासांच्या इशाऱ्यानंतर हा हल्ला करण्यात आला आहे.
इराणने वॉशिंग्टनसोबत करार केला नाही किंवा होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली नाही, तर इराणला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतरही इराणने अमेरिकेला जुमानलं नाही, त्यामुळे आता थेट इराणच्या राजधानीवरच अमेरिकेने हल्ला केल्याचं पाहायला मिळत आहे.
तर मागील 36 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेला इराणने देखील कडवी झुंज दिल्याचं दिसत आहे. नुकतंच इराणने अमेरिकेची दोन लढाऊ विमाने पाडल्याची माहिती समोर आली आहे. इराणच्या या कारवाईमुळे ट्रम्प चांगलेच भडकले आहेत. त्यामुळेच आता त्यांनी आपल्या सोशल मीडियावरून थेट हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केल्याचं दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.